शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागावर कारवाईचे आदेश

By admin | Updated: June 21, 2016 00:21 IST

महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग आणि नगररचना विभागात जी कामे दिवसा करणे शक्य होत नाहीत, अशी नियमबाह्य कामे सायंकाळी सहा वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत चालतात

पिंपरी : महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग आणि नगररचना विभागात जी कामे दिवसा करणे शक्य होत नाहीत, अशी नियमबाह्य कामे सायंकाळी सहा वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत चालतात. या लोकमतने केलेल्या फाइल मंजुरीसाठी ‘रात्रीस खेळ चाले’ या स्टिंग आॅपरेशनचे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी वादळी चर्चा झाली. बांधकाम विभागाच्या सायंकाळी उशिरापर्यंत चालणाऱ्या कामकाजाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महापौर शकुंतला धराडे यांनी दिले. महापालिकेतील नगगरचना व बांधकाम परवाना विभागात रोजच दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी अधिक लगबग असते. सामान्य नागरिकांऐवजी बिल्डरांचीच जास्त बडदास्त राखली जाते. नियमानुसार जी कामे दिवसा करणे शक्य होत नाहीत, अशी कामे दिवस मावळल्यानंतर अर्थपूर्ण व्यवहार करून उरकली जातात. इतर विभागांचे कामकाज सहाला संपत असताना नगररचना आणि बांधकाम परवाना विभागाचे कामकाज सुरू होेते. हे दोन विभाग मलई देणारे असल्याने येथे पोस्टिंगसाठी अधिकारी अडीच लाख देण्याची तयारी ठेवतात, आदी मुद्दे सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केले. यासह रात्रीच्या वेळी अधिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ओव्हरटाइम देऊन त्यांचा सत्कार करावा, अशी उपरोधिक टीकाही करण्यात आली.शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी सभागृहात ‘लोकमत’ झळकावीत या दोन विभागांच्या कारभाराबाबत प्रशासनाला धारेवर धरले. रात्री उशिरापर्यंत थांबून बेकायदा फायली मंजुरीच्या कारभाराबाबतची गंभीर दखल घ्यायला हवी. अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उशिरापर्यंत का थांबतात? त्यांचा नेमका काय उद्देश असतो? या गोष्टी स्पष्टव्हायला हव्यात. या विभागात उशिरापर्यंत चालणाऱ्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी उबाळे यांनी केली. नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या की, लोकमतने या विभागातील कार्यालय बंद झाल्यानंतरचा कारभार स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आणला आहे. सायंकाळी सहानंतर अधिकारी, कर्मचारी काय करतात, याकडे गांभीर्याने पाहायला हवे. यासह दिवसभरात कामकाज उरकणे शक्य असतानाही रात्री उशिरापर्यंत थांबण्याची काय आवश्यकता आहे? दोन्ही विभागांची कार्यालये वेळेत बंद व्हावीत, असे आदेश द्यावेत.(प्रतिनिधी)‘त्यांची’ ड्रेनेज विभागात बदली करा!रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करायला हवा, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे उल्हास शेट्टी यांनी केली. सामान्य नागरिकांपेक्षाही बिल्डरांची कामे करण्यास येथील अधिकारी प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. आर. एस. कुमार म्हणाले, या विभागात पोस्टिंग मिळण्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये मोजले जातात. बदली झाली, तरी काही अधिकारी पुन्हा येथे येण्यासाठी आग्रही असतात. वर्षानुवर्षे येथेच काम करणाऱ्यांना पाणीपुरवठा, ड्रेनेज या विभागांत टाकायला हवे.काँगे्रसचे भाऊसाहेब भोईर यांनी या प्रकरणावरून अधिकाऱ्यांवर उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, ‘‘या विभागातील अधिकारी वेळेपेक्षाही अधिक काम करतात. त्यांना या कामाचा ‘ओव्हरटाइम’ द्यायला हवा. यासह त्यांच्यावरील अतिरिक्त कामाचा ताण पाहता त्यांचा जाहीर सत्कार करावा.’’ या प्रकरणावरून सभागृहातील नगरसेवक गंभीर झाल्याने महापौर शकुंतला धराडे यांनी या दोन्ही विभागांतील कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. ‘लोकमत’ झळकवलाबांधकाम परवाना व नगररचना विभागातील कारभाराबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. या वृत्ताची नगरसेवकांनी गंभीर दखल घेत या वृत्ताचे सभागृहात सविस्तर वाचन करून अशा कारभारामुळे महापालिकेची प्रतिमा मलीन होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी गटनेत्या सुलभा उबाळे, सीमा सावळे व भाऊसाहेब भोईर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.