शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठातील विचारपीठांना खीळ

By admin | Updated: April 14, 2015 01:43 IST

महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला समजावा या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या बहुतांश अध्यासनांचे कामकाज सुमारे वर्षभरापासून ठप्प आहे.

पुणे : महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला समजावा या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या बहुतांश अध्यासनांचे कामकाज सुमारे वर्षभरापासून ठप्प आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनासह तब्बल १५ अध्यासन प्रमुखांची पदे रिक्त असल्यामुळे विचारपीठाच्या कामकाजाला खीळ बसली आहे.विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पंडित भीमसेन जोशी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शंतनूराव किर्लोस्कर, सेठ हिराचंद नेमचंद जैन, डी. एस. सावकार, आय.एस.आर.ओ. (इस्रो) स्पेस चेअर, जैवतंत्र व जैव माहितीशास्त्र अध्यासन अशा एकूण १९ अध्यासनांची स्थापना करण्यात आली. परंतु, यातील अनेक अध्यासनांवर गेल्या काही वर्षांपासून प्रमुखांची नियुक्तीच केली गेली नाही. त्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची जबाबदारी वयाच्या ७० वर्षांपर्यंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी सांभाळली. परंतु, दोन महिन्यांपूर्वी कसबे हे सेवानिवृृत झाल्यामुळे आंबेडकर अध्यासनाचे पद रिक्त आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन प्रमुखपद रिक्त असले तरी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे हे या अध्यासनाचे समन्वयक म्हणून कामकाज पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये अध्यासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय व स्थानिक संस्थांशी करार करून विविध कार्यशाळा तसेच व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. परंतु, अध्यासनासाठी केवळ २.५ कोटी रुपयांची तरतूद केली जात असल्यामुळे विविध कामे करण्यास मर्यादा येतात, असे मत काही अध्यासन प्रमुखांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)अध्यासनांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून, अध्यासन प्रमुखांच्या कामकाजाची नियमावली तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. अध्यासनांचे कामकाज अधिक सक्षमपणे चालावे, असा प्रयत्न विद्यापीठातर्फे केला जातो. विद्यापीठ फंडातून अध्यासनांसाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जातो. राज्य शासन, केंद्र शासन किंवा कोणत्याही संस्थेकडून अध्यासनांसाठी आर्थिक सहकार्य मिळत नाही.- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ृत्रुटी असल्याने अहवाल नाकारला४अध्यासनांच्या कामात सुसूत्रता कशी आणता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली होती. परंतु, या समितीने दिलेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्यामुळे विद्यापीठाने या अहवालाची अंमलबजावणी केली नाही. तसेच अध्यासन प्रमुखपदाचा कार्यकाल संपल्यानंतर रिक्त पदावर विद्यापीठाने नवीन व्यक्तींची नियुक्तीही केली नाही. परिणामी वर्षभरापासून अध्यासनांचे कामकाज ठप्प आहे.