शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

Women Reservation Bill: महिलांसाठी आणलेले विधेयक लोकसभेत नाकारून विरोधकांकडून महिलांचा अपमान - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:53 IST

Women Reservation Bill महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांना महिलांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, हेच यातून स्पष्ट झाले आहे

पुणे : महिलांसाठी आणलेले विधेयक लोकसभेत नामंजूर होणे दुर्दैवी होते. हा दिवस खऱ्या अर्थाने काळा दिवस होता. देशातील महिलांना सन्मान व न्याय देण्यासाठी आणलेले हे विधेयक नाकारून विरोधकांनी महिलांचा अपमान केला असल्याची टीका उदय सामंत यांनी केली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर धर्मवीर आनंद दिघे नागरी साहाय्यता कक्षाचे उद्घाटन पुण्यात सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

सामंत म्हणाले, विरोधकांना महिलांसमोर जाऊन आता मते मागण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांना महिलांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, हेच यातून स्पष्ट झाले आहे. उद्धवसेनेच्या माजी खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला असेल, तर त्यांचे अभिनंदन करायला हवे असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कॅप्टन अशोक खरातवर कारवाईची मागणी

कॅप्टन अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही. अशा नीच प्रवृत्ती ठेचून काढण्याची शिवसेनेची भूमिका आहे. या प्रकरणाचा एसआयटी तपास सुरू असून, त्यातील सत्य लवकरच बाहेर येईल. दोषींना सोडले जाणार नाही. तपास यंत्रणेच्या कामात मला हस्तक्षेप व त्यावर भाष्य करता येणार नाही. खरातसोबत कोणाचे फोटो आले म्हणजे तेही तितकेच दोषी आहेत, असे मानणे योग्य नाही.

पुण्यातील नागरिकांना या कक्षाचा चांगला लाभ होईल

शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळावा, यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पुढे यावे. साहाय्यता कक्षाची चळवळ गावागावांत पोहोचावी, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. अशा उपक्रमांतून समाज तर घडतोच, पण तुमच्यातील नेतृत्वही विकसित होते. चांगले काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच उभी राहते. र्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी त्यांना मदतीचा हात देण्याचा धर्म शिवसेना पक्षाने पाळलेला आहे. धर्मवीर आनंद दिघे अखेरच्या श्वासापर्यंत सामान्यांसाठी कार्यरत होते. त्यांच्याच नावाने शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'धर्मवीर आनंद दिघे नागरी साहाय्यता कक्ष' ही लोकचळवळ सुरू झाली आहे. पुण्यातील नागरिकांना या कक्षाचा चांगला लाभ होईल व शिवसेनेची सामान्य लोकांप्रती असलेली बांधीलकी अधिक घट्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Women's Reservation Bill rejection insults women, says Uday Samant.

Web Summary : Uday Samant criticized the rejection of the Women's Reservation Bill in Lok Sabha, calling it an insult to women. He stated opposition parties don't want to give reservation to women. He also demanded strict action against Captain Ashok Kharat.
टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारlok sabhaलोकसभाParliamentसंसद