शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बावधन प्रकल्पाला विरोध

By admin | Updated: February 3, 2015 01:02 IST

बावधन भागातील लोकवस्तीत नियोजित असलेल्या कचरा वर्गीकरण शेड्सच्या कामासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध वाढला आहे.

कोथरूड : बावधन भागातील लोकवस्तीत नियोजित असलेल्या कचरा वर्गीकरण शेड्सच्या कामासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध वाढला आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी अ‍ॅमेनिटी स्पेस समितीची परवानगी घेण्यात न आल्याने हे काम बंद करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका पुष्पा कनोजिया यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. स्थानिक नागरिकांनी या विरोधात सह्यांची मोहीम राबविली असून, महापालिका आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे.बावधन भागातील मराठा मंदिर भागातील पुणे महापालिकेच्या रिकाम्या जागेवर कचरा वर्गीकरण करण्यासाठी पुणे महापालिकेच्या कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने घनकचरा विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु, दरम्यानच्या काळातच अ‍ॅमेनिटी स्पेस समितीच्या वतीने या जागेलगतच बायोगॅस प्रकल्प असल्याने जागेच्या वापरात बदल करण्यास परवानगी दिलेली आहे. या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार, पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात २० लाखांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.सध्या या जागेवर खासदार प्रकाश जावडेकर यांच्या निधीतून १८ लाखांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम अ‍ॅमेनिटी स्पेस कमिटीची परवानगी न घेतल्याने बंद करण्यात आले आहे. मराठा मंदिर परिसरातच पुणे महापालिकेचा ५ टन क्षमतेचा ओला कचरा प्रकल्प असतानाही नव्याने कचरा वर्गीकरण प्रकल्प झाल्यास स्थानिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या वतीने अन्य प्रभागांत संबंधित प्रकल्प स्थलांतरित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)४याबाबत पुणे महापालिकेचे सहायक आयुक्त अविनाश सकपाळ यांनी संबंधित काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून, याबाबत स्थानिकांच्या भावनेचा विचार करून काम बंद केले असल्याचे सांगितले. मात्र, पुणे महापालिकेने कचरा वर्गीकरण प्रकल्प बंद न केल्यास पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रशांत कनोजिया यांनी दिला आहे.