शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रियेबाहेरील विद्यार्थ्यांनाही संधी

By admin | Updated: June 30, 2015 23:27 IST

प्रवेश यादीत स्थान मिळूनही काही कारणास्तव ५० रुपये शुल्क भरून प्रवेश न घेऊ शकलेले विद्यार्थी, आॅनलाईन अर्ज भरूनही तो सबमीट न केलेले विद्यार्थी

पिंपरी : प्रवेश यादीत स्थान मिळूनही काही कारणास्तव ५० रुपये शुल्क भरून प्रवेश न घेऊ शकलेले विद्यार्थी, आॅनलाईन अर्ज भरूनही तो सबमीट न केलेले विद्यार्थी तसेच काही कारणास्तव या प्रक्रियेत आॅनलाईन अर्ज न भरू शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी दिली जाणार आहे. सध्या सुरू असलेली प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही.इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत सध्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत सुमारे ६८ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका घेतली होती. तसेच ६८ हजार विद्यार्थ्यांपैकी पहिल्या प्रवेश फेरीत सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार महाविद्यालय देण्यात आले. त्यांपैकी केवळ ४२ हजार विद्यार्थ्यांनी ५० रुपये शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित केला. त्यामुळे सुमारे १३ हजार विद्यार्थी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले. तसेच, अनेक विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे आॅनलाईन अर्ज करता आला नाही. काही विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जातील केवळ पहिला भाग भरला. काहींनी दोन्ही भाग भरले; मात्र हा अर्ज ते सबमीट करू शकले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी आॅनलाईन प्रक्रियेत येऊ शकले नाही. या तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीने त्यांच्यासाठी स्वतंत्र आॅनलाईन प्रवेश राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना प्रवेश समितीचे अध्यक्ष व विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव म्हणाले, ‘‘विविध कारणांमुळे आॅनलाईन प्रक्रियेतून बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाईल. त्यांच्या विविध तक्रारी आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया सध्या सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेतील तिसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर राबविण्यात येईल. तिसऱ्या फेरीनंतर रिक्त राहणाऱ्या जागांवरच हे प्रवेश दिले जातील. त्याबाबतचे वेळापत्रक व नियमावली प्रवेश समितीच्या बैठकीनंंतर जाहीर केली जाईल.’’ (प्रतिनिधी)