दार उघड रं उद्धवा....; पुण्यात भाजपकडून मंदिरे खुली करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी व घंटानाद करत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:43 PM2020-08-29T14:43:11+5:302020-08-29T14:57:04+5:30

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत..

Open the door of temple..; In Pune, the BJP was shouting slogans and ringing bells against the state government | दार उघड रं उद्धवा....; पुण्यात भाजपकडून मंदिरे खुली करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी व घंटानाद करत आंदोलन

दार उघड रं उद्धवा....; पुण्यात भाजपकडून मंदिरे खुली करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी व घंटानाद करत आंदोलन

Next
ठळक मुद्देशहरात ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते साडेचार महिन्यांपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहे.. परंतु, गेले कित्येक दिवस मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तरीदेखील राज्य सरकारकडून याची दखल घेतली गेली नसल्याने शनिवारी ( दि.29) राज्य शासनाच्या विरोधात  भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पुण्यात देखील विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. 

पुण्यातील सारसबाग मंदिर, ओंकारेश्वर मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणी घंटानाद, टाळ वाजवून तर काही ठिकाणी गोंधळ घालून देखील आंदोलन करण्यात आले.यावेळी पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले. 

या आंदोलनाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, भाजपशहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या अनेक भाजपा  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आंदोलनाच्या वेळी राज्यसरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
       गिरीश बापट म्हणाले,राज्यात काही अपवाद वगळता सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेली मंदिरे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार घ्यायला तयार नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या कालावधीपासून धार्मिक स्थळांचे दर्शन घडलेले नाही.श्रावण महिन्यात देखील भाविकांनी संयम पाळत मंदिरांच्या दर्शनाचा हट्ट केला नाही. मात्र अजूनही मंदिरे खुल करण्यात येत नसल्यामुळे भाविकांची खूप मोठी नाराजी आहे. पण राज्य सरकारकडून भाविकांच्या भावनांची  कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.त्यामुळे भाजपकडून राज्यभर राज्य शासनाच्या विरोधात घंटानाद आंदोलन पुकारणात आले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन तरी राज्य सरकारने भाविकांना दर्शनासाठी त्वरित मंदिरे खुली करून द्यावी.

यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्धवा अजब तुझे सरकार, दार उघड उद्धवा दार उघड, पुरे झाले पुरे झाले, मंदिरांची दारे खुली करा यासारख्या घोषणा देत राज्य सरकारचा जोरदार घंटानाद करत निषेध नोंदवण्यात आला.

Web Title: Open the door of temple..; In Pune, the BJP was shouting slogans and ringing bells against the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.