शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

तरुण पिढीच उज्ज्वल राष्ट्र घडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:11 AM

पुणे : आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या देशातील तरुणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. देशातील तरुण पिढीचा योग्य प्रकारे उपयोग करून ...

पुणे : आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या देशातील तरुणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. देशातील तरुण पिढीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतल्यास एक उज्ज्वल राष्ट्र घडवण्यास नक्कीच मदत होईल. तसेच केंद्र शासनातर्फे ‘नवीन युवा धोरण’ तयार केले जात असून ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणचा विस्तार असेल. त्यात तंदुरुस्ती आणि खेळ यावर अधिक जोर देण्यात येईल, असे केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

सिम्बायोसिस सेंटर फॉर इमोशनल वेल-बिइंग, एसआययू व एमपॉवर यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत किरेन रिजिजू बोलत होते. यावेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर ,कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, एमपॉवरच्या संस्थापक नीरजा बिर्ला, सिम्बायोसिस विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरावडेकर, गिरिजा महाले आदी उपस्थित होते.

रिजीजू म्हणाले, भारताला एक उत्तम क्रीडा राष्ट्र बनवायचे असून त्यासाठीच ‘खेलो इंडिया’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्यात विद्यापीठ स्तरावर खेळले जाणारे खेळ हे जागतिक दर्जाचे आहेत. तसेच केंद्र शासनाने ‘फिट इंडिया’ मोहीम सुरू केली असून त्यासाठी भारतातील विद्यापीठांनी नेतृत्त्वाची भूमिका घ्यावी.

भारत विकसनशील राष्ट्र असून ‌येथे सर्वत्र स्पर्धात्मक वातावरण आहे. त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होते; तेव्हाच ती जीवनाच्या सर्व बाबींमध्ये यशस्वी होते. केवळ क्रीडा क्षेत्रातीलच व्यक्ती नव्हे तर प्रत्येक भारतीय व्यक्ती तंदुरुस्त असायला हवी, असेही रिजीजू यांनी सांगितले.