शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

School: एकच शिक्षक! ग्रामस्थ संतप्त; शिरूर तालुक्यात पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:02 IST

जो पर्यंत शिक्षक मिळत नाही तो पर्यंत शाळा सुरु करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली

शिरूर : आज राज्यात सर्वत्र शाळा सुरु होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विदयार्थ्यांचे स्वागत केले जात असताना शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे मात्र शिक्षक मिळत नसल्याने पहिल्याच दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. आज सकाळी दहा वाजता शाळा भरण्यापूर्वी एकत्र येत संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. व घोषणाबाजी करत शिक्षण विभागाचा निषेध नोंदवला. जो पर्यंत शिक्षक मिळत नाही तो पर्यंत शाळा सुरु करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.   कोळगाव डोळस येथे काही महिन्यापूर्वी विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याने बाळु गुंजाळ या शिक्षकाचे शिक्षण विभागाने निलंबन केले होते. यामुळे येथे एकमेव शिक्षक चार वर्गांना शिकवत आहेत. ग्रामस्थांनी लेखी  निवेदन देत वारंवार शिक्षक देण्याची मागणी करूनही शिक्षण विभागाने येथे नवीन शिक्षक नेमला नाही. गेली पाच ते सहा महिण्यापासून या शाळेत एकच शिक्षक शिकवण्याचे काम करत आहे. या शाळेत  ५० पेक्षा अधिक पटसंख्या एकच शिक्षक असल्याने विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी अनेक पालकांनी आपली मुले इतर शाळेत पाठवण्यास सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन तसेच तोंडी मागणी केली आहे.परंतु याकडे शिक्षण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आज शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी विद्यार्थनाचे स्वागत बाजूला ठेवून शाळेला कुलूप ठोकले. 

यावेळी उपसरपंच सिद्धार्थ डोळस, राष्ट्रवादीचे सरचिटणीस विलास जगताप, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जगताप, माजी सरपंच सोमनाथ सूर्यवंशी, सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष बाबू गोरे,नारायण शेडगे, प्रकाश वाळुंज, संभाजी कुल, आबासाहेब नागवडे, यशवंत पडवळ, प्रकाश पडवळ, अर्जुन सूर्यवंशी, प्रमोद धामोरे, शंकर कोळपे, उमेश सूर्यवंशी, बाळासाहेब धुमाळ आदी उपस्थित होते.

गेल्या सहा महिन्यापासून शिक्षक मागणीची वेळोवेळी निवेदने देऊनही शिक्षणाधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे अखेरीस शाळेला कुलूप ठोकण्याची वेळ आली आहे. - कैलास सूर्यवंशी, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती

ग्रामस्थांच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर केंद्रप्रमुखांना संबंधित शाळेवर पाठवले आहे. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करुन शाळेला एक शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार: आहे. ग्रामस्थांनी सहकार्य करावे. - बाळकृष्ण कळमकर , गटशिक्षणाधिकारी शिरूर

 

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरSchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र