शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, फक्त फांद्या तोडल्या; पुण्याच्या महापौरांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 16:56 IST

मोदींच्या सभेसाठी जवळपास 20 झाडांवर कुऱ्हाड

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी महाविद्यालय परिसरातील झाडं तोडल्यामुळे एका बाजूला संताप व्यक्त होत असताना पुण्याच्या महापौरांनी अजब दावा केला आहे. मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, तर फक्त फांद्या तोडल्या, असं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटलं आहे. टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर 17 ऑक्टोबरला मोदींची सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी व्यासपीठाच्या जवळ असणारी आणि सुरक्षेला अडथळा आणणारी जवळपास 20 झाडं तोडण्यात आली. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता झाडं नव्हे, फांद्या तोडण्यात आल्याचा अजब दावा महापौर मुक्ता टिळक यांनी केला. 'फांद्या तोडण्यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली होती. तशी रितसर परवानगी मिळाल्यानंतरच फांद्या तोडण्यात आल्या,' असं महापौर म्हणाल्या.पंतप्रधानांची सभा असल्यानं त्यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी फांद्या कापण्यात आल्याचं टिळक यांनी सांगितलं. 'परवा पुण्यात वादळी पाऊस झाला होता. त्यामुळे झाडपडीच्या घटना घडल्या. आता 17 तारखेला पंतप्रधानांची सभा आहे. त्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फांद्या तोडण्यात आल्या. याबद्दलची परवानगी देण्याचा अधिकार आयुक्तांना असतो. कारण ते वृक्ष प्राधिकरण समितीचे चेअरमन असतात,' असं टिळक म्हणाल्या. 'ज्या ठिकाणच्या फांद्या कापण्यात आल्या, ती जागा खासगी आहे. त्यामुळे त्यासाठीची परवानगी लोकप्रतिनिधी मागत नसतात. तिथल्या संस्थेनं तशा प्रकारची परवानगी मागितली असेल आणि पालिकेनं परवानगी देण्याची शक्यता आहे,' असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. याआधी 14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सिंहगड रस्त्यावरील झाडे कापण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण ते आश्वासन हवेतच विरले. दुसरीकडे या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली असून खासदार वंदना चव्हाण यांनी आयुक्त सौरभ राव यांना पत्र देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Mukta Tilakमुक्ता टिळकPuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदी