शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; राजस्थानी अभिनेत्रीसह २ रशियन तरुणी रंगेहाथ जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 11:35 IST

पुण्यातील विमानतळ परिसरात उच्चभ्रू हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश..२ रशियन तरुणी आणि १ राजस्थानी अभिनेत्रीचा सेक्स रॅकेटमध्ये सहभाग.. विदेशात बसून दलाल ऑनलाईन बुकिंग घ्यायचे..

- किरण शिंदे

पुणे : बुधवारी रात्री पुणे शहरातून सेक्स रॅकेट संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचने एका टॉप मॉडेलसह दोन रशियन तरुणींना विमानतळ परिसरातील एका उच्चभ्रू हॉटेलमधून वेश्याव्यवसाय करताना रंगेहाथ पकडले. यातील टॉपची मॉडेल असलेली तरुणी ही राजस्थानातील अपकमिंग अभिनेत्री असल्याचे सांगण्यात येते. मात्र तपासल्यानंतर या तिघींनाही अटक केले नाही तर त्यांना रेस्क्यू करण्यात आले. आरोपी दलाल इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन संन्याशी याचा शोध पोलीस घेत आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून राजस्थानी अभिनेत्री पुण्यात वास्तव्याला होती. पुण्यातील वेगवेगळ्या आणि उच्चभृ हॉटेलमध्ये तिचे वास्तव्य होते. तर इतर दोन रशियन मॉडेल यादेखील पुण्यातील उच्चभ्रु  हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या. वेशा व्यवसायाचं हे मॉडेल संपूर्णतः ऑनलाइन होतं. विदेशात आणि भारतातल्या वेगवेगळ्या शहरात बसून यातील दलाल ऑनलाईन व्यवहार करायचे. एकदा का ग्राहक सापडला की त्याच्याशी व्हाट्सअप वरून संपर्क साधायचे. व्हाट्सअपवरच या मॉडेलचे फोटो त्यांना पाठवले जायचे. या मॉडेलच्या मोबदल्यात काही तासासाठी हजारोंच्या घरात पैसे घेतले जात होते. एकदा का पैसे संबंधित दलाच्या खात्यात जमा झाले त्यानंतरच संबंधित मॉडेल तरुणीला बुक केलेल्या उच्चभ्रू हॉटेलमध्येच पाठवले जायचे.

दरम्यान क्राइम ब्रँचच्या पोलिसांना या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरातील एका उच्चभृ हॉटेलमध्ये धाड मारण्यासंदर्भात ऑर्डर दिली होती. त्यानंतर क्राईम ब्रँचच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ग्राहक असल्याचा खोटा कॉल केला. त्याने टॉप मॉडेलची मागणी केली. यानंतर दलाल असलेल्या व्यक्तीने अनेक फोटो व्हाट्सअप वर पाठवले. क्राइम ब्रँचच्या या कर्मचाऱ्यांनी यातील एक फोटो सिलेक्ट केला. सिलेक्ट केलेली तरुणी ही राजस्थानी अभिनेत्री होती. त्यानंतर विमानतळ परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये ही भेट ठरली होती.

ठरल्यानुसार सगळं झालं अन् ही अभिनेत्री त्या हॉटेलमध्ये आली. त्याचवेळी सापळा रचून बसलेल्या क्राईम ब्रँचने धाड टाकली आणि तिला ताब्यात घेतलं. त्याचवेळी कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमधून दोन रशियन तरुणींनाही ताब्यात घेतले. या सर्व तरुणींची रवानगी आता रेस्क्यू होम मध्ये करण्यात आली. राजस्थानी अभिनेत्री असलेल्या या तरुणीची अशी काय मजबुरी होती की तिने हा पेशा पत्करला? याचा तपास आता क्राईम ब्रँचचे पोलीस करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट