कांदा कडाडणार

By Admin | Updated: May 26, 2015 23:17 IST2015-05-26T23:17:45+5:302015-05-26T23:17:45+5:30

आवक कमी झाल्याने मंगळवारी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यास १० किलोस १९६ रुपये असा बाजारभाव मिळाला.

Onion shriek | कांदा कडाडणार

कांदा कडाडणार

मंचर : कांद्याचे बाजारभाव वाढले असून, तो लवकरच १० किलो २०० रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. आवक कमी झाल्याने मंगळवारी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यास १० किलोस १९६ रुपये असा बाजारभाव मिळाला.
मध्यंतरी कांदा पिकाचे भाव स्थिर होते. आवक जास्त येत असल्याने बाजारभाव वाढत नव्हते. पावसाचा तडाखा कांदा पिकाला बसल्याने तो खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. कांदा टिकाव धरत नाही. बराखीत ठेवलेला कांदा सडू लागला आहे. त्यामुळे कांदा लवकरच बाजारात नेऊन विकायला शेतकरी प्राधान्य देतात. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतील तालुक्याच्या बहुतेक गावातून कांदा विक्रीसाठी येतो.
मंगळवारी आवक कमी
होऊन सुमारे पाच हजार पिशवी कांद्याची आवक कमी झाली.
मागील लिलावाला आठ हजार पिशवी आवक झाली होती. आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढले गेले. (वार्ताहर)

१० किलो कांद्यास १३० ते १९६ रुपये बाजारभाव मिळाला आहे. कांदा लवकरच २०० रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

Web Title: Onion shriek