शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, वाटाणा, गवार, मेथीने खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2015 02:07 IST

पाण्याच्या कमतरतेमुळे बारामती तालुक्याच्या बागायती भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडींना फाटा देऊन तरकारी पिकांच्या लागवडी केल्या. त्यामुळे बाजारातील भाजीपाला

बारामती : पाण्याच्या कमतरतेमुळे बारामती तालुक्याच्या बागायती भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडींना फाटा देऊन तरकारी पिकांच्या लागवडी केल्या. त्यामुळे बाजारातील भाजीपाला अणि फळभाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर राहिले आहेत. मात्र कांदा, गवार, मेथी, वाटाणा यांनी चांगलाच भाव खाल्ला आहे. पावसाळा सुरू झाला की , बारामतीच्या बागायती भागात मोठ्या प्रमाणात अडसाली ऊस लागवडी केल्या जातात. पावसाने मारलेली दडी व पाण्याच्या कमतरेमुळे भविष्यात ऊस जगविणे मुश्कील होणार आहे. तसेच धरणांमध्येही अल्प पाणीसाठा आहे. तालुक्यातील सर्वच साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस लागवडींमध्ये २५ ते ३० टक्के घट झाली आहे. घट झालेल्या क्षेत्रावर येथाल शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तरकारी पिकांच्या लागवडी केल्या आहेत. परिणामी भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात स्थिर राहण्यास मदत झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पुढील दोन-तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांना प्राधान्य दिले आहे. मात्र कांदा ६० रुपये किलो, गवार ५० रुपये किलो तर मेथीचा एक पेंडी १५ रुपयाला मिळत आहे. आठवडी बाजारात अजून दर वाढले नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. परंतु याही महिन्यात पाऊस झाला नाही तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याचे दर वाढतील असे येथील भाजी विक्रेत्या पुष्पा गदादे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)