दुर्देवी! मुलीला भेटायला चाललेल्या वडिलांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 11:58 IST2022-03-16T11:57:33+5:302022-03-16T11:58:46+5:30

दोन वाहनांमध्ये समोरासमोर घडक...

one killed in an accident on bhimashankar manchar road | दुर्देवी! मुलीला भेटायला चाललेल्या वडिलांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

दुर्देवी! मुलीला भेटायला चाललेल्या वडिलांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

तळेघर (पुणे): मंचर-भीमाशंकर रस्त्यावर पोखरी घाटामध्ये दुचाकी व चार चाकी ह्या वाहनांमध्ये झालेल्या अपघातामध्ये एक ठार तर दोन किरकोळ जखमी झाले आहेत.

भीमाशंकरमंचर रस्त्यावर गोहे बु॥ विठ्ठलवाडी हद्दीमध्ये पोखरी घाटामध्ये कटींगण ह्या मोठ्या वळणावर दुचाकी (एम. एच. १४ ई. आर. ५३७३) व चार चाकी (एम. एच. १२ जी. आर. ९०५८) ह्या दोन वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये रामचंद्र शंकर साबळे (वय ७० वर्षे, रा. डिंभे बु) यांचा जागीच मृत्यू झाला.

साबळे हे आपला नातू करण साबळे यांच्या समवेत राजेवाडी येथे आपल्या मुलीला भेटावयास चालले होते. तर चार चाकीमधून काही प्रवासी भीमाशंकरकडून मंचरच्या दिशेला जात होते.

पोखरी घाटामध्ये असणाऱ्या कटिंग या अति धोकादायक वळणावर या दोन्ही वाहनांची धडक झाली. यामध्ये रामचंद्र साबळे यांचा जागीच मृत्यू झाला. घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने करीत आहेत.

Web Title: one killed in an accident on bhimashankar manchar road