शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

नदीत बुडून एकाचा मृत्यू

By admin | Updated: September 17, 2016 01:14 IST

पिंपळे सौदागर येथील देवी आई माता व दत्त मंदिर घाटावर गणपती विसर्जन करणाऱ्या एकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.

रहाटणी : पिंपळे सौदागर येथील देवी आई माता व दत्त मंदिर घाटावर गणपती विसर्जन करणाऱ्या एकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि. १५) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. शंकर हुसेन लोखंडे (वय ४८, रा. वैदूवस्ती, पिंपळे गुरव) असे मृताचे नाव आहे. लोखंडे हे पालिकेत ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागात घंटागाडी सफाई कामगार म्हणून कंत्राटी तत्त्वावर मागील १५ वर्षांपासून कामास होते. अनंतचतुर्थीदिवशी दिवसभर याच घाटावर त्यांची गणपती विसर्जनासाठी नियुक्ती करण्यात आली होती. या ठिकाणी तराफा तयार करण्यात आला होता. गणेशभक्तांकडील गणेश मूर्ती कृत्रिम हौदात बुडवून त्या तराफ्यावरून नदीपात्रात बुडविण्यात येत होत्या. हे काम लोखंडे व त्यांचे साथीदार करीत होते. मात्र, रात्री उशिरा त्या तराफ्यावरून तोल जाऊन पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मध्यरात्री या घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी हजर झाले होते. मात्र, अंधारामुळे शोधकार्यात अडथळा येत असल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. पुन्हा पालिकेच्या संत तुकारामनगर अग्निशमन केंद्रातील बारा व रहाटणीतील चार जवान सकाळी साडेसात वाजल्यापासून शोध घेत होते. (वार्ताहर)