शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

पुण्यातील गंज पेठेत दुचाकी पुन्हा एकदा लक्ष्य ; ५ गाड्या पेटवल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 3:41 PM

रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून गंज पेठेत दुचाकी वाहनांना आपले लक्ष्य केले़.

ठळक मुद्देदुचाकीच्या मागच्या बाजूला असलेल्या टपऱ्या त्यात सापडून आग भडकण्याची होती़ शक्यता सुदैवाने अग्निशामक दलाची गाडी २ ते ३ मिनिटात तेथे पोहचल्याने आग तातडीने विझविली़

पुणे : दोघांमधील वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा गुंडांनी गंज पेठेत दुचाकी वाहनांना आपले लक्ष्य केले़. गंज पेठेतील नाल्याजवळ पार्क केलेल्या ५ गाड्यांना कोणीतरी आग लावून पेटवून दिले़. त्यात या पाचही गाड्या जळून खाक झाल्या़. सुदैवाने अग्निशामक दलाची गाडी २ ते ३ मिनिटात तेथे पोहचल्याने ही आग तातडीने विझविली़. दुचाकीच्या मागच्या बाजूला असलेल्या टपऱ्या त्यात सापडून आग भडकण्याची शक्यता होती़. गंज पेठेतील लहुजी वस्ताद तालीमजवळ नाल्याशेजारी काही जणांनी आपल्या दुचाकी पार्क केल्या होत्या़. पहाटे सव्वा तीन वाजता कोणीतरी येथील पाचही दुचाकींना एकाच वेळी आग लावली़. याची खबर काही वेळाने अग्निशामक दलाला मिळाली़. अग्निशामक दलाच्या मुख्य केंद्रापासून हे ठिकाण जवळच असल्याने अग्निशामक दलाची गाडी तातडीने तेथे पोहचली़. तोपर्यंत या पाचही गाड्या ४० ते ४५ टक्के जळाल्या होत्या़. जवानांनी पाणी मारुन ही आग तातडीने विझविली़. या गाड्यांच्या मागे काही टपऱ्या होत्या़. या टपऱ्याच्या मालकांनी सरंक्षणासाठी वरच्या बाजूला पुढे बार उभारुन कापडे लावली होती़. गाड्यांना लागलेल्या आगीत ती कापडे जाळली़. त्यांचे बारही वितळले़ पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने अग्निशामक दलाला उशिरा माहिती मिळाली़. आणखी उशीर झाला असता तर आणि या टपऱ्याही पेटल्या जाण्याची शक्यता होती़. एकाचवेळी पाचही गाड्यांना आगी लागल्याने कोणीतरी ती जाणीवपूर्वक ही आग लावल्याची शक्यता अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी व्यक्त केली आहे़. फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिस