Indapur News | वाढदिवसाला तलवारीने केक कापने पडले महागात; गुन्हा दाखल, तलवार जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 12:24 IST2023-03-22T12:19:13+5:302023-03-22T12:24:35+5:30

तलवारीने केक कापत असतानाची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर वायरल...

On birthdays, cutting the cake with a sword is expensive; Case registered, sword seized | Indapur News | वाढदिवसाला तलवारीने केक कापने पडले महागात; गुन्हा दाखल, तलवार जप्त 

Indapur News | वाढदिवसाला तलवारीने केक कापने पडले महागात; गुन्हा दाखल, तलवार जप्त 

इंदापूर (पुणे) : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे तरुणाला महागात पडले आहे. इंदापूर पोलीसांनी नोटीस देऊन त्याच्यावर आर्म ॲक्ट कलम ४ सह २५ अन्वये गुन्हा नोंदवत त्याच्याकडील तलवार जप्त केली आहे.     

सचिन दिलीप सातव (वय २८ वर्षे,रा. बिजवडी ता. इंदापूर) असे या युवकाचे नाव आहे. तलवारीने केक कापत असतानाची त्याची क्लिप समाज माध्यमांवर वायरल झाली. मंगळवारी (दि.२१) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतले. नोटीस दिली. तलवार ताब्यात घेतली. पोलीस कर्मचारी नंदू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म ॲक्ट कलम ४ सह २५ अन्वये त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, पोलीस नाईक सलमान खान पोलीस कर्मचारी. नंदू जाधव, विनोद लोखंडे यांनी ही कारवाई केली आहे. 

Web Title: On birthdays, cutting the cake with a sword is expensive; Case registered, sword seized