शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Omicron: पुणे जिल्ह्यात ऐन ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर कडक निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 18:24 IST

जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी शहर आणि जिल्ह्यातील निर्बंधा संदर्भात शनिवारी स्वतंत्र आदेश काढले आहेत...

पुणे : राज्यासह जिल्ह्यात ओमायक्रॉन व कोरोना (omicron varient pune) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या ऐन हंगामात पुन्हा एखदा हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर पन्नास टक्क्यांचे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मज्जाव अस असल्याने रात्रीच्या पार्ट्या देखील एक प्रकारची बंदी आली आहे. या नव्या निर्बधामुळे हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर व्यावसायिकासह नववर्षांच्या स्वागतासाठी तयारीत असलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी शहर आणि जिल्ह्यातील निर्बंधा संदर्भात शनिवारी स्वतंत्र आदेश काढले आहेत. यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह  पुणे जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यात शनिवारपासून (दि.25) पासून पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. यात सध्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात देखील ओमायक्रॉन व कोरोना रुग्णांची संख्या गेल्या दोन आठवड्यात वाढ असताना दिसत आहे. येत्या काही दिवसात नाताळ, लग्न सराई, इतर सणवार व नविन वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ लोकांची गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सदयसिधीतील निर्बंधांपेक्षा अधिक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. यामुळेच जिल्हाधिकारी यांनी खालील निर्बंध लागू केले आहेत.जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागासाठीचे निर्बंध-

  • हाॅटेल्स,  रेस्टॉरंट, जिम, स्पा, सिनेमा व नाटयगृहे तेथील आसनक्षमतेच्या ५०% मर्यादेच्या अधिन राहून सुरु ठेवण्यास मुभा राहील. परंतू तेथे एकुण आसनक्षमता व परवानगी देण्यात आलेली ५०% क्षमता याबाबत सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावा.
  • विवाह समारंभ बंद जागेमध्ये आयोजित करतेवेळी अधिकतम १०० उपस्थितांची मर्यादा पाळण्यात यावी. असे समारंभ मोकळया जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त २५० व त्या ठिकाणच्या क्षमतेच्या २५% यापैकी जो संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.
  • अन्य सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये जेथे लोकांची सतत उपस्थिती राहील असे कार्यक्रम बंद जागेमध्ये आयोजित करतेवेळी अधिकतम १०० उपस्थितांची मर्यादा पाळण्यात यावी. असे समारंभ मोकळया जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त २५० व त्याठिकाणाच्या क्षमतेच्या २५ % यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.
  • वर नमूद केलेल्या कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांचे आयोजन बंद जागेमध्ये करित असतांना आसन व्यवस्था फिक्स असलेल्या ठिकाणी त्याजागेच्या ५०% क्षमतेइतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे, तसेच बंद जागेमध्ये परंतु आसन व्यवस्था फिक्स नसलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करित असतांना व आसन व्यवस्था त्याजागेच्या २५% क्षमतेइतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. असे कार्यक्रम मोकळया जागेमध्ये आयोजित करतांना त्याजागेच्या क्षमतेच्या २५% पेक्षा अधिक उपस्थिती राहाणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • क्रिडास्पर्धा व सामन्यांचे आयोजन करतांना प्रेक्षक क्षमतेच्या अधिकतम २५% उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी. 
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस