शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारही करणार मतदान

By admin | Updated: February 24, 2015 00:27 IST

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या थकबाकीदार सभासदांना मतदानाचा अधिकार देऊ नये, या संदर्भात उच्च न्यायालयात

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या थकबाकीदार सभासदांना मतदानाचा अधिकार देऊ नये, या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याने या मतदारांना आता मतदानाचा अधिकार मिळणार आहे. शेतकरी कृती समितीचे नेते रंजन तावरे यांनी सलग तीन वर्ष ऊस पुरवठा न केलेले सभासद, जमीन नसलेले सभासद, थकबाकीदार व मृत सभासदांची नावे मतदार याद्यांमध्ये समावेश केला असल्याची न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. या प्रकरणाची सुनावणी आज न्यायालयापुढे होती. योगायोग म्हणजे सुनावणी असतानाच आजच दि. २३ रोजीच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे या प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे या घटनात्मक पेचावर पडदा पडला आहे. न्यायालयाचा आम्ही आदर करतो. मात्र, प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम २५ तारखेला जाहीर होणार, असे सांगितले होते. त्यापूर्वीच कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता आम्ही जनतेच्या दरबारात न्याय मागू. प्रशासनाने तीन दिवस उशिराने जाहीर होणारा कार्यक्रम आजच जाहीर केला. त्यामुळे माळेगावच्या कार्यक्षेत्रातील सुज्ञ ऊस उत्पादक सभासद योग्य तो निर्णय घेतील, असे याचिकाकर्ते रंजन तावरे यांनी सांगितले.