धक्कादायक! स्वतःच्या आईला मुलाने आणि सुनेने केली चपलेने मारहाण; वृद्ध महिलेचा हात फ्रॅक्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 13:29 IST2021-12-08T13:10:01+5:302021-12-08T13:29:58+5:30

या मारहाणीत वृद्ध महिलेचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे...!

old mother was beaten by her son fractured arm crime news | धक्कादायक! स्वतःच्या आईला मुलाने आणि सुनेने केली चपलेने मारहाण; वृद्ध महिलेचा हात फ्रॅक्चर

धक्कादायक! स्वतःच्या आईला मुलाने आणि सुनेने केली चपलेने मारहाण; वृद्ध महिलेचा हात फ्रॅक्चर

पुणे : आपल्या ८० वर्षाच्या आईला ६० वर्षाच्या मुलाने काठीने मारुन तसेच ५५ वर्षाच्या सुनेने चपलेने मारहाण करुन तिचा हात फ्रॅक्चर करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी निळकंठ गजानन पाबळे (वय ६०) आणि मिना निळकंठ पाबळे (वय ५५, रा. बुधवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता बुधवार पेठेत घडला. याबाबत शांताबाई गजानन पाबळे (वय ८०, रा. बुधवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा मोठा मुलगा आहे. फिर्यादीचा एक नातू याचा काही वर्षापूर्वी मृत्यु झाला आहे. तर दुसरा नातू सागर यालाही आपली सासू मारण्याचा प्रयत्न करते, असे फिर्यादीच्या सूनेला वाटते. फिर्यादी या सोमवारी रात्री ८ वाजता घरात खाटेवर झोपल्या असताना त्यांचा मोठा मुलगा निळकंठ व त्यांची पत्नी मिना हे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करुन "तू आमचा मुलगा सागर याला मारुन टाकण्याचा प्रयत्न करते" असे बोलून जमिनीवर पडलेली काठी निळकंठ याने घेऊन त्याने आपल्या ८० वर्षाच्या आईच्या हातावर, अंगावर मारहाण केली. त्यांची सून मिना हिने चपलेने मारहाण केली.

या मारहाणीत त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. फरासखाना पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title: old mother was beaten by her son fractured arm crime news