दौंड तालुक्यातील केडगाव येथे बिबट्याशी वृध्द महिलेची झुंज 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 02:42 PM2019-09-16T14:42:14+5:302019-09-16T14:46:46+5:30

एका वृद्ध महिलेने थेट बिबट्यावरच लाठीने हल्ला करून त्याला पिटाळून लावल्याची थरारक घटना घडली..

old lady fights with leopard in daund taluka | दौंड तालुक्यातील केडगाव येथे बिबट्याशी वृध्द महिलेची झुंज 

दौंड तालुक्यातील केडगाव येथे बिबट्याशी वृध्द महिलेची झुंज 

Next

केडगाव : बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला चढविल्याचे पाहून एका वृद्ध महिलेने थेट बिबट्यावरच लाठीने हल्ला करून त्याला पिटाळून लावल्याची थरारक घटना दौंड तालुक्यातील देलवडी येथे रविवारी घडली. सुुशीला येळे (वय ६३) असे या वृद्ध महिलेचे नाव असून, त्यांच्या या धाडसाचे कौतूक होत आहे.
 देलवडी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याने दहशत पसरवली आहे.  यामुळे ग्रामस्थ बाहेर पडण्यास धजावत नाहीत, अशा स्थितीतही सुशीला येळे या येथील एका पडीक जमिनीत त्यांच्या बकऱ्यांना आणि शेळ्यांना चरायला घेऊन आल्या होत्या. जवळपास १२ बकऱ्या आणि शेळ्या चरत असताना अचानक त्याच्या दोन पिलांसह दबा धरून असलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविला. बकऱ्यांचा आवाज आल्याने सुशीलाबाई धावत तेथे गेल्या. यावेळी बिबट्या शेळ्यांवर हल्ला करत असताना त्यांना दिसला. यावेळी त्यांनी न घाबरता थेट त्यांच्या हातातील काठीने बिबट्यावर हल्ला चढविला. यावेळी चवताळून बिबट्याने त्यांच्यावर प्रतिहल्ला केला; मात्र त्यांनी न घाबरता काठीने बिबट्याला बदडून काढले. 
यामुळे घाबरलेला बिबट्या त्याच्या बछड्यांना तोंडामध्ये घेऊन पसार झाला. येळे यांच्या प्रसंगावधानाने आणि साहसामुळे त्यांचा स्वत:चा अन् शेळ्यांचा जीव वाचला. 

Web Title: old lady fights with leopard in daund taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.