शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

भेंडी, गवार, कैरी स्वस्त; घेवडा, गाजर वधारले

By admin | Updated: April 17, 2017 06:33 IST

गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात शेतमालाची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने भेंडी, गवार, पावटा,

पुणे : गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात शेतमालाची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने भेंडी, गवार, पावटा, काकडी, तोतापुरी कैरी स्वस्त झाली आहे. तर, श्रावणी घेवडा, गाजर यांच्या दरात वाढ झाली असून इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत.मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यांतून आलेल्या फळभाज्यांत हिमाचल प्रदेशमधून २ ट्रक मटार, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ ट्रक कोबी, गुजरात आणि कर्नाटकातून १० ते १२ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ७ ते ८ टेम्पो तोतापुरी कैरी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा इतकी आवक झाली, असे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले. स्थानिक मालामध्ये सातारी आल्याची १४०० ते १५०० पोती, टॉमेटो साडेपाच ते ६ हजार क्रेट्स, फ्लॉवर १८ ते २० टेम्पो, कोबी १० ते १२ टेम्पो, शेवगा ७ ते ८ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, चिंच २५ ते ३० पोती, गावरान कैरी ७ ते ८ टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा १२५ ट्रक, गुजरात, आग्रा, इंदूर आणि स्थानिक बटाट्याचे मिळून ६० ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेपाच ते ६ हजार गोण्यांची आवक झाली, असेही भुजबळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी) पालेभाज्यांचे दर स्थिरमार्केट यार्डात रविवारी पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या १ लाख ५० हजार जुड्यांची, तर मेथीच्या ४० हजार जुड्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असली तरी सर्वच पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले.पालेभाजांचे शेकड्यातील दर पुढीलप्रमाणे : कोथिंबीर : ५००-१४००, मेथी : ८००-१२००, शेपू : ५००-८००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ५००-८००, चवळई : ५००-६००, पालक : ५००-६००.फुलांची मागणी घटलीलग्नसराईचा हंगाम सुरू असला तरी लग्नाच्या तिथी आहेत. त्यामुळे बाजारात फुलांची आवकही कमी होत आहे. मात्र, सर्व फुलांचे भाव टिकून आहेत. गेल्या आठवड्यात हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे सर्व प्रकारच्या फुलांना चांगले दरही चांगले मिळाले. पुढील आठवड्यात अक्षयतृतीया असल्यामुळे फुलांना मागणी वाढेल आणि दरही वाढतील, अशी शक्यता फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी व्यक्त केली.डाळिंब झाले स्वस्त; लिंबू, मोसंबी, पपई महाग मार्केट यार्डात फळबाजारात फळांची मागणी वाढल्याने लिंबू, मोसंबी, पपई यांच्या दरात वाढ झाली आहे. तर आवक वाढल्याने डाळिंबाच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली. कलिंगड, खरबुजाचे दर टिकून आहेत. उन्हाळ्यामुळे लिंबाला मोठी मागणी असल्याने लिंबाला चांगला दर मिळत आहे.