Diwali 2025: दिवाळी फराळाच्या तयारीला महागाईची झळ;तेल डब्याच्या दरात तब्बल ३५० रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:30 IST2025-10-10T10:29:36+5:302025-10-10T10:30:31+5:30

Diwali 2025 Oil Price Hike: हरभरा डाळ, शेंगदाणे, साखरेचे भावही वधारले;किराणा खरेदीत यंदा दिलासा नाहीच, गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्के दरवाढीमुळे गृहिणींचे ‘बजेट’ कोलमडले

Oil price hiked by Rs 350 per can; Gram, dal, peanuts, sugar prices also increased | Diwali 2025: दिवाळी फराळाच्या तयारीला महागाईची झळ;तेल डब्याच्या दरात तब्बल ३५० रुपयांची वाढ

Diwali 2025: दिवाळी फराळाच्या तयारीला महागाईची झळ;तेल डब्याच्या दरात तब्बल ३५० रुपयांची वाढ

पिंपरी : दिवाळीची चाहूल लागली असून यंदा फराळाच्या तयारीत गृहिणींना दिलासा मिळालेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत किराणा दरामध्ये १० ते १५ टक्के झालेल्या वाढीमुळे ‘बजेट’ कोलमडले आहे. विशेषतः खाद्यतेलाच्या डब्याच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३५० रुपयांची वाढ झाली असून, हरभरा डाळ, शेंगदाणे, साखर, डालडा आणि पिठी साखरेचे दरही वाढले आहेत.

दिवाळीच्या फराळासाठी लागणारे हरभरा डाळ, रवा, तांदळाचे पीठ, मैदा, शेंगदाणे, काजू, मनुका, खोबरे, गूळ, साखर, तेल, तूप आणि मसाले मागील वर्षाच्या तुलनेत महागले आहे. नव्या जीएसटी रचनेत केवळ डेअरी पदार्थ आणि सुकामेव्याचे दर कमी झाले असले, तरी बाकी किराणा साहित्य जुन्याच दरात किंवा अधिक किमतीत घ्यावे लागत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी फराळाच्या खर्चात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेल, डाळी व साखरेच्या दरवाढीमुळे फराळाचे प्रमाण कमी करावे लागणार आहे.

दरवाढ आणि कारणे

- तेलाचा भडका : तेलाच्या डब्याचा दर १९०० रुपयांवरून २२५० रुपयांवर.

- किराणा दरवाढ : हरभरा डाळ, रवा, साखर, डालडा, पिठी साखर यांचे दर सरासरी ५ ते १० टक्क्यांनी वधारलेले.

- वाहतूक खर्च वाढ : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम होलसेल बाजारावर.

यंदाचे होलसेल दर (रुपये)

(कंसात गतवर्षीचे दर)

| साहित्य | यंदाचे दर | गतवर्षीचे दर |

| हरभरा डाळ | ८० ते ११० | ७० ते १०० |

| रवा | ४२ | ४० |

| साखर | ४३ | ४० |

| तेल डबा (जेमिनी) | २२५० | १९०० |

| शेंगदाणे | १४० | १२० |

| मैदा | ४० | ४० |

| डालडा | १६० | १४० |

| पिठी साखर | ४८ | ४२ |

डेअरी पदार्थ आणि सुकामेव्याचे दर

| पदार्थ | यंदाचे दर | गतवर्षीचे दर |

|-----------|--------------|------------|

| बदाम | ८८० | ९५० |

| काजू | ९२० ते १५०० | ६०० ते ९०० |

| पिस्ता | १२०० ते १६००| १००० ते ११००|
 

फराळासाठी लागणाऱ्या मसाल्यांवरील जीएसटी पूर्वीप्रमाणेच पाच टक्के असल्याने त्यांचे दर स्थिर आहेत. जीएसटी बदलांचा परिणाम अल्प प्रमाणात झाला आहे.  - मोहन चौधरी, मसाले व फूड होलसेल विक्रेते  

 

डेअरी पदार्थ आणि सुकामेवा यांचा जीएसटी दर १८ व १२ टक्क्यांवरून घटून पाच टक्के झाला आहे. त्यामुळे तूप, बटर आणि सुकामेव्याचे दर थोडे कमी झाले आहेत. मात्र इतर किराणा माल महागच आहे.  - अमित अग्रवाल, ड्रायफ्रूट व किराणा होलसेल विक्रेते

Web Title: Oil price hiked by Rs 350 per can; Gram, dal, peanuts, sugar prices also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.