बापरे! तब्बल १७ लाखांचा २८ किलो गांजा जप्त; मुंढवा परिसरातील कारवाई

By नितीश गोवंडे | Updated: March 14, 2025 18:12 IST2025-03-14T18:11:14+5:302025-03-14T18:12:02+5:30

आरोपी गांजा कोणाला देणार होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे

Oh my! 28 kg of ganja worth Rs 17 lakh seized; Action taken in Mundhwa area | बापरे! तब्बल १७ लाखांचा २८ किलो गांजा जप्त; मुंढवा परिसरातील कारवाई

बापरे! तब्बल १७ लाखांचा २८ किलो गांजा जप्त; मुंढवा परिसरातील कारवाई

पुणे : मुंढवा भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १६ लाख ८० हजारांचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला. प्रमोद सुधाकर कांबळे (४४, रा. किल्ला वेस, करमाळा, जि. सोलापूर) आणि विशाल दत्ता पारखे (४१, रा. मोहननगर, आदित्य सोसायटी, विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मुंढवा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी कांबळे आणि पारखे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी आझाद पाटील यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून कांबळे आणि पारखे यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली असता त्यात गांजा आढळून आला. त्यांच्याकडून १६ लाख ८० हजारांचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला. आरोपी गांजा कोणाला देणार होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, आझाद पाटील, मयूर सूर्यवंशी, संदीप जाधव, संदीप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, चेतन गायकवाड, रवींद्र राेकडे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.

 

Web Title: Oh my! 28 kg of ganja worth Rs 17 lakh seized; Action taken in Mundhwa area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.