शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी ऐकत नाहीत; पक्षातही कोंडी

By admin | Updated: October 10, 2015 05:12 IST

एकीकडे अधिकारी ऐकत नाहीत, तर दुसरीकडे पक्षातून होत असलेली कोंडी यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे अस्वस्थ झाल्या आहेत. पद असले, तरी ते केवळ

- मंगेश पांडे,  पिंपरीएकीकडे अधिकारी ऐकत नाहीत, तर दुसरीकडे पक्षातून होत असलेली कोंडी यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे अस्वस्थ झाल्या आहेत. पद असले, तरी ते केवळ शोभेसाठीच आहे की काय, अशी परिस्थिती आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत पिंपळे गुरव प्रभागातून नगरसेवकपदी निवडून आलेल्या शकुंतला धराडे यांना राखीव जागेसाठी आरक्षित असलेल्या महापौरपदी संधी मिळाली. राज्य मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या महापौरपदाची सूत्रे त्यांनी १२ सप्टेंबर २०१४ ला हाती घेतली. सुरुवातीला त्यांनी सर्वांच्या म्हणण्यानुसार कारभार सुरू ठेवला. साध्या पण तितक्याच कडक स्वभावाच्या, अशी त्यांची ओळख निर्माण झाली. एकहाती सत्ता असल्याने सभागृह चालविणे अथवा इतर कामकाज चालविणे यामध्ये त्यांना फारशा अडचण येणार नव्हती, हे निश्चित होते. मात्र, नंतरच्या कालावधीत त्यांना पक्षातून अडचण निर्माण होऊ लागली. त्यामध्ये मग पक्षबैठक असो की, इतर कोणताही निर्णय, आदींचा समावेश आहे. महापौर धराडे या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाच्या मानल्या जातात. मात्र, जगताप यांनी भाजपशी जवळीक साधल्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धराडे यांच्याशीही थोडे वेगळेपणाने वागण्यास सुरुवात केली. महापालिकेतील जगताप विरोधी गट महापौरांपासून तसे दूरच राहिले. दरम्यान, प्रशासनावर अगोदरपासूनच वचक असणारे नदीच्या अलीकडील पक्षाचे नेत्यांचे कदम आणि बहल यांचे आजही अधिकारी ऐकतात. तर दुसरीकडे पद असूनही धराडे यांचे बोलणे मनावर घेतले जात नाही. एखाद्या प्रश्नी अधिकाऱ्यांना बोलावून पोटतिडकीने प्रश्न मांडतात. तेवढ्यापुरते अधिकारीदेखील हो, हो म्हणतात. मात्र, नंतर महापौरांच्या आदेशाकडेच दुर्लक्ष केले जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. याबाबत महापौरांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.दोन आठवड्यांपूर्वीच आयुक्त कोणतीही कल्पना न देता मुंबईला गेले. दुसऱ्या दिवशी बैठक असताना आदल्या दिवशीच मुंबईला जाण्याचे काय कारण होते, असे महापौरांचे म्हणणे होते. याबाबतही त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. असे प्रकार वारंवार घडत आहेत. महापौर बदलाची चर्चामहापौर पदाचे आरक्षण अडीच वर्षांसाठी आहे. मात्र, या काळात सव्वा वर्षांसाठी दोन महापौरांना संधी देण्यात येणार आहे. तसेच, धराडे यांना एक वर्षे पूर्ण झाले आहे. त्यामुळे महापौर बदलाची चर्चा सुरू आहे. शिक्षण मंडळ निवडणुकीमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांना संधी मिळाली. त्यामुळे महापौर पद कोणत्या गटाला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे.