शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

By admin | Updated: March 13, 2015 06:29 IST

जुन्या हद्दीच्या प्रारुप विकास आराखड्यावरील (डीपी) चर्चेवेळी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांचा ऐकरी उल्लेख एका पदाधिकाऱ्याकडून झाला

पुणे : जुन्या हद्दीच्या प्रारुप विकास आराखड्यावरील (डीपी) चर्चेवेळी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांचा ऐकरी उल्लेख एका पदाधिकाऱ्याकडून झाला. त्यावरून उपमहापौर आबा बागुल व गटनेते अरविंद शिंदे यांच्यात बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. दोन पदाधिकाऱ्यांच्या या वादामुळे काँग्रेसची डीपीवरील बैठक आज (शुक्रवारी) पुन्हा घेण्याचा निर्णय झाला. प्रारुप विकास आराखड्यातील बांधकाम नियमावलीचे (डीसी रुल) सादरीकरण मुख्यसभेत करण्यात आले. मात्र, त्याविषयी काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांचे आक्षेप आहेत. त्यामुळे डीपीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस भवन येथे आज बैठक झाली. त्यावेळी शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, आबा बागुल, अरविंद शिंदे, मुकारी अलगुडे, संजय बालगुडे, अविनाश बागवे यांच्यासह १५ नगरसेवक उपस्थित होते. विकास आराखड्यावर नियोजन समिती नियुक्त करण्यास जादा कालावधी लागला आहे. त्यामुळे डीपी मंजुरीला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यावर समिती नियुक्त करण्यासाठी कोणामुळे उशीर लागला. त्यावेळी आपलेच सरकार अन् मुख्यमंत्री होता, असा उल्लेख दुसऱ्या एका पदाधिकाऱ्याने केला. मात्र, मुख्यमंत्री यांच्यासारख्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांबद्दल एकेरी शब्द वापरल्याचा आक्षेप बागुल यांनी घेतला. त्यावरून शिंदे व बागुल यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. अखेर वादावर पडदा टाकण्यासाठी ही बैठक उद्या पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.