नाभिक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By Admin | Updated: June 9, 2015 05:15 IST2015-06-09T05:15:03+5:302015-06-09T05:15:03+5:30

महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे ग्रामीण विभाग पुणे जिल्हा नाभिक समाजाच्या वतीने नाभिक समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले.

Nucleus community collectors | नाभिक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

नाभिक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

तळेघर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे ग्रामीण विभाग पुणे जिल्हा नाभिक समाजाच्या वतीने नाभिक समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले.
प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वीर जिवबा महाले यांचे स्मारक पंधरा गुंठे जागेत करण्यात यावे, पुणे शहरात नाभिक भवनाला तीन गुंठे जागा देऊन शासकीय निधीतून बांधण्यात यावे, वीररत्न शिवबा काशिद यांचे स्मारक म्युरल्सच्या माध्यमातून उभारण्यात यावे व अर्धपूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय समित्या तसेच विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नाभिक समाजाच्या २५ कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी, नाभिक समाजाला प्रगतिपथावर नेण्यासाठी व छोट्या जाती समूह घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी नियोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षी पंचवीस लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.
या वेळी प्रदेश प्रसिद्धी प्रमुख रामदास सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रमेश राऊत, कार्याध्यक्ष बबन काशिद, सुभाष जाधव, रोहिदास कोल्हाळ, शंकरराव रायकर, प्रदीप रायकर, सुधीर गवळी, नितीन साळुंके, राजू जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Nucleus community collectors