शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! पुण्यातील मार्केट यार्डात १४०० ग्रॅमचे हनुमानफळ दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 21:05 IST

हनुमानफळ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

ठळक मुद्देगेल्या पंधरा दिवसांपासून मार्केट यार्डातील हनुमानफळाची आवक सुरु

पुणे : नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन परिसरातून गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये रविवारी हनुमानफळांची आवक झाली. तब्बल १ किलो ४०० ग्रॅमचे एक हनुमानफळ पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.
गेल्या पंधरा दिवसांपासून मार्केट यार्डातील हनुमानफळाची आवक सुरु झाली आहे़  सुरुवातीच्या काळात ही आवक तुलनेने कमी होती. आता ही आवक वाढू लागली आहे. रविवारी ५० क्रेट इतकी हनुमानफळाची आवक झाली़ एका क्रेटमध्ये १५ ते १६ किलो इतकी हनुमानफळे असतात़ उच्च दर्जाच्या फळास ८० ते १०० रुपये, मध्यम दर्जाच्या फळास ५० ते ७० रुपये आणि दुय्यम दर्जाच्या मालास ४० रुपये प्रतिकिलोस दर मिळाला़  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन चांगले आहे़  चांगला पाऊस झाल्यामुळे मालाचा दर्जा चांगला आहे़  शहरासह उपनगरातील स्ट्रॉलविक्रेते आणि घरगुती ग्राहकांकडून या फळास मागणी होती़
याबाबत व्यापारी संतोष ओसवाल यांनी सांगितले की, हनुमान फळ हे रामफळ व सीताफळ यांच्या जातीचेच एक फळ आहे. हनुमान फळ हे सीताफळाप्रमाणेच असले तरी आकाराने ओबडधोबड असते. ते फळ चवीला अननसाप्रमाणे आंबट-गोड असून त्याचा गर आइस्क्रीमसारखा मऊ असतो, त्यामुळे तो चमच्याने खाता येतो. हनुमान फळात सीताफळापेक्षा खूप कमी बिया असतात. एका हनुमान फळाचे वजन १०० ग्रॅमपासून दीड किलोपर्यंत असते. एका झाडाला सुमारे ४० किलो वजनाची फळे लागतात. फळाचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारी असा असतो असेही ओसवाल यांनी नमूद केले़
---
हनुमानफळापासून चांगले उत्पन्न
गेल्या तीन-चार वर्षांपासून आमच्या शेतात लागवड केलेले हनुमानफळ मार्केटयार्डात विक्रीस पाठवित आहे़ त्याला प्रतिकिलोस १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ आम्ही २ एकर क्षेत्रावर लागवड केली आहे़  गेल्यावर्षी अडीच लाख रुपयांचे उत्पादन मिळाले होते यंदा त्यामध्ये वाढ होवून पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे़़
- नंदू आण्णा गवळी, शेतकरी राशीन (कर्जत तालुका)

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड