- पोपट पवार
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एकीकडे सोने, चांदीचे दर गगनाला भिडले असले तरी हौसेला मोल नसते, याचा प्रत्यय कोल्हापुरात आला आहे. कोल्हापूर - सांगली मार्गावरील एका हौशी सासऱ्याने आपल्या जावयासाठी तब्बल दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवली आहे. कोल्हापूर शहरातील चांदी कारागिराने आठ दिवस परिश्रम घेऊन हा चप्पलचा जोड बनवला आहे.
कोल्हापूर अन सांगली जिल्ह्यात वास्तव्य असणाऱ्या एका धनाढ्य बापाच्या लाडक्या लेकीचं लग्न, मग काय लेकीबरोबर जावयाचीही हौस झालीच पाहिजे. याच हौसेखातर वधूपित्याने जावयासाठी चक्क चांदीची चप्पल बनवण्याचे काम सांगली जिल्ह्यातील एका सराफाकडे दिले. त्याने हे काम कोल्हापूर शहरातील एका नामवंत चांदी कारागिराला दिले. त्यांनी दीड किलो चांदीची हुबेहूब कोल्हापुरी चप्पल बनवून दिली आहे. यासाठी दोघेजण आठ दिवस झटत होते. विशेष म्हणजे या कारागिराने याच महिन्यात पिण्याच्या पाण्याचे चार आणि पाच किलो वजनाचे चांदीचे दोन पिंप बनवले आहेत. धोंड्याच्या महिन्यात जावयाला दान करताना हौशी सासरवाडीकडून काटकसर केली जात नसल्याचे दिसते.
हौसेला नाही मोल
या कोल्हापुरी चांदीच्या चप्पलची किंमत चार लाख रुपये असून, त्यासाठी २२ हजार रुपयांची मजुरी झाली आहे.
सोने, चांदीचे भाव वाढत असले तरी हौसेपुढे किमत शून्य असते, याचा प्रत्यय कोल्हापुरात आला आहे.
Web Summary : Defying economic slowdown, a Kolhapur father-in-law gifted his son-in-law 1.5 kg silver Kolhapuri slippers. A local artisan crafted the unique footwear, costing ₹4 lakh plus ₹22,000 labor, showcasing that extravagance knows no bounds.
Web Summary : मंदी को धता बताते हुए, कोल्हापुर के एक ससुर ने अपने दामाद को 1.5 किलो चांदी की कोल्हापुरी चप्पल उपहार में दी। एक स्थानीय कारीगर ने ₹4 लाख लागत से अनोखे जूते बनाए, जिससे पता चलता है कि फिजूलखर्ची की कोई सीमा नहीं है।