दुबई : संयुक्त अरब अमिरातीच्या एकमेव अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला झाला असून, यामुळे परिसरात आग भडकली. यात कोणतीही जीवितहानी किंवा किरणोत्सर्ग झाल्याचे वृत्त नाही. परंतु यामुळे इराणसोबतच्या युद्धविरामाला असलेला धोका अधोरेखित करीत पुन्हा युद्ध सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या हल्ल्याची जबाबदारी कोणीही तत्काळ स्वीकारली नाही आणि संयुक्त अरब अमिरातीनेही कोणावर ठपका ठेवला नाही. तथापि, इराणने अजूनही आपल्या नियंत्रणाखाली ठेवलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव वाढल्याने, गेल्या काही दिवसांत इराणने अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आरोप संयुक्त अरब अमिरातीने केला आहे. अमेरिका इराणच्या बंदरांची नाकेबंदी करत आहे आणि अधिक चिरस्थायी शांततेसाठी केलेले राजनैतिक प्रयत्न वारंवार अयशस्वी ठरले आहेत. (वृत्तसंस्था)
डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा कठोर इशारा दिला आहे. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी, "इराणसाठी वेळ वेगाने संपत चालली आहे. त्यांनी तातडीने पावले उचलली पाहिजेत, अन्यथा त्यांच्याकडे काहीच उरणार नाही. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे," असे म्हटले.
सुरक्षिततेवर परिणाम नाही
संयुक्त अरब अमिरातीच्या अणुऊर्जा नियामक संस्थेने म्हटले आहे की, या आगीमुळे बरकाह प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर परिणाम झाला नाही. सर्व युनिट्स नेहमीप्रमाणे कार्यरत आहेत. या हल्ल्यामुळे एका विद्युत जनरेटरला आग लागली.
पुन्हा युद्धाच्या खाईत?
इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा ठप्प झाली आहे. यामुळे मध्य-पूर्व पुन्हा एकदा उघड युद्धाच्या खाईत लोटले जाण्याची शक्यता आहे.
Web Summary : A drone attack targeted a UAE nuclear plant, sparking a fire but causing no radiation leak or casualties. Tensions escalate with Iran, raising fears of renewed conflict amid stalled talks and accusations of Iranian aggression. Trump issued a stern warning to Iran.
Web Summary : यूएई के परमाणु ऊर्जा संयंत्र पर ड्रोन हमला हुआ, आग लगी लेकिन कोई विकिरण रिसाव या हताहत नहीं हुआ। ईरान के साथ तनाव बढ़ा, ठप्प वार्ता और ईरानी आक्रमण के आरोपों के बीच नए संघर्ष का डर बढ़ गया। ट्रम्प ने ईरान को कड़ी चेतावनी दी।