शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांना नोटीस

By admin | Updated: April 14, 2015 01:35 IST

वारंवार सूचना देऊनही विषय समित्यांच्या बैठकांना दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे.

पुणे : वारंवार सूचना देऊनही विषय समित्यांच्या बैठकांना दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. शहर सुधारणा समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीस काही मोजकेच विभागप्रमुख उपस्थित राहिल्याने संतापलेल्या समिती सदस्यांनी या प्रकाराची तक्रार थेट अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे केली. त्याची गंभीर दखल घेत अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे बकोरिया यांनी सांगितले. महापालिकेच्या स्थायी समिती खालोखाल येणाऱ्या चार विषय समित्या आहेत. या समित्यांमध्ये शहरातील विषयांसंदर्भात निर्णय घेतले जात असले, तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या समित्यांकडे कानाडोळा केला जातो. त्यामुळे अनेकदा या समित्या तहकूब करून महापालिका प्रशासनाचा निषेधही करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. आज सकाळी शहर सुधारणा समितीची बैठक सुरू झाली असताना, केवळ दोन ते तीन विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर आपल्या विभागाशी संबधित विषय नसल्याने अनेक अधिकाऱ्यांनी महापालिकेत असूनही दांडी मारली होती. त्यामुळे संतापलेल्या शहर सुधारणा समिती सदस्यांच्या वतीने अध्यक्षा रूपाली पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे या प्रकाराची तक्रार करून या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. $$्निअधिकारी बैठकीला उपस्थित राहत नाहीत. याबाबत यापूर्वीही तक्रारी आल्या आहेत. त्या वेळी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून समज दिली होती. मात्र, त्यानंतरही असे प्रकार घडतच असल्याने आज बैठकीस अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती घेऊन खुलासा मागविण्यात येणार असल्याचे बकोरिया यांनी स्पष्ट केले. समाधानकारक खुलासा नसलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.