शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 20:32 IST

Pune Police News : पुणे पोलिसांनी मुलींनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

Pune Police News : पुण्यात काल पोलिसांनी मुलींना मारहाण करुन शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी आता नवीन अपडेट समोर आली आहे. मारहाण, शिवीगाळ, जातीवाचक शब्द वापरले या कोणत्याच आरोपामध्ये तथ्य नसल्याचे पुणेपोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी पुण्यातील कोथरुड पोलिसांनी मारहाण आणि जातीवाचक शब्द वापरले असल्याचा आरोप तीन मुलींनी केला होता. पोलिसांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. 

पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आरोप फेटाळून लावले. या संपूर्ण प्रकरणात काहीही तथ्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं स्पष्ट केले. 

येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी

"छत्रपती संभाजी नगरची एका मिसिंग महिलेची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास करण्यासाठी पोलीस पुण्यात आले होते आणि त्यांना आम्ही दोन दामिनी मार्शल दिले. कोथरूड पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र देऊन महिला कर्मचारी गरज असल्याचं सांगितलं होतं, तसा लेखी अर्ज दिला होता. महिला सहाय्यता कक्ष आणि हिरकणी कक्ष या ठिकाणी या महिलेची चौकशी केली. यात मिसिंग मुलगी होती ती ट्रेस झाली.  यानंतर पोलिसांचे त्या ठिकाणी पथक पोहोचले. ते पथक संबंधित मुलीला घेऊन निघून गेले, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. 

"पहाटे पोलिसांनी आम्हाला मारहाण केल्याची तक्रार संबंधित मुलींनी केली होती. यात प्रथमदर्शनी कोणत्याही तथ्य आढळून आलं नाही. अनेक कार्यकर्ते पोलीस आयुक्तालयात आले तिथेही त्यांना यात तथ्य नसल्याचे सांगितलं. या संदर्भात सगळ्यांना लेखी पत्र देऊन देखील कळवण्यात आले, असंही पोलीस उपायुक्त कदम म्हणाले.

आमची मागणी एफआयआर दाखल करा अशी होती; श्वेता पाटील

"एक तारखेपासून आम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी मागे लागलो आहे. दिवसभर आम्हाला भेटायला सगळे अधिकारी आले, पण सगळ्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. पोलिसांनी नीट ऐकूनही घेतलं नाही. पोलिसांनी हे प्रकरण सिरीअस घेतले नाही, आमची मागणी फक्त आमचा अधिकार फक्त एफआयआर दाखल करुन घ्या एवढीच होती. आमच्यासोबत अनेक संघटनांचे लोक होते.त्यांनी शेवटपर्यंत एफआयआर दाखल करुन घेतला नाही, ज्या मुलींवर अत्याचार झाला होता त्या मुलींना एक तारखेला उचलले होते. तेव्हापासून त्या झोपलेल्या नाहीत. त्यांचं मेडिकल आम्ही खासगी रुग्णालयात केले. आम्ही त्यांना एफआयआर दाखल करत नाही असं एक पत्र द्या. दोन तासानंतर त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं. त्यामध्ये त्यांनी एफआयआर दाखल करणार नाही म्हणून सांगितलं. आमची मागणी फक्त एफआयआर दाखल करा एवढीच आहे, अशी माहिती श्वेता पाटील  यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस