केवळ स्वतःचेच नाही; इतर स्त्रियांचेही रक्षण करता यावे - रूपाली चाकणकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:35 IST2025-11-25T09:35:06+5:302025-11-25T09:35:29+5:30
चाकणकर यांनी प्रत्यक्षरीत्या पोलीस मदत कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी एका महिला सदस्याला ११२ वर फोन लावायला सांगितला. त्यानंतर त्या कॉलला तत्काळ प्रतिसाद देत त्या भागातील मार्शल त्या ठिकाणी लगेच पोहोचले.

केवळ स्वतःचेच नाही; इतर स्त्रियांचेही रक्षण करता यावे - रूपाली चाकणकर
धायरी : स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचार तसेच बाहेरील समाजामध्ये वावरताना अनेक दुष्प्रवृत्तींकडून होणारा त्रास अशा प्रत्येक परिस्थितीत सक्षमपणे उभे राहता आले पाहिजे. यासाठी प्रत्येक स्त्रीला कायद्याचे योग्य ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. केवळ स्वतःचेच नाही तर इतर स्त्रियांचेही रक्षण करता यावे, हा महत्त्वाचा उद्देश बाळगून ‘सक्षमा तू’ हे अभियान सुरू करत असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.
ने क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान आयोजित "सक्षमा तू" हा विशेष कार्यक्रम सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील स्वर्गीय सुषमा स्वराज हॉल येथे नुकताच पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलिस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक नम्रता सोनवणे, आदी अधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. शार्दुल कोंढाळकर, नेहा मोरे, रेश्मा गोदांबे, प्रतिभा चाकणकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
भर कार्यक्रमात महिलांनी मागितली पोलीस मदत
पोलिस अधिकाऱ्यांनी उपस्थितांना महिला सुरक्षितताबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रत्यक्षरीत्या पोलिस मदत कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी एका महिला सदस्याला ११२ वर फोन लावायला सांगितला. त्यानंतर त्या कॉलला तत्काळ प्रतिसाद देत त्या भागातील मार्शल त्या ठिकाणी लगेच पोहोचले.