शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

टोलमुक्तता नाहीच!

By admin | Updated: April 11, 2015 05:18 IST

राज्यशासनाने विधानसभेत शुक्रवारी टोल विषयीचे धोरण जाहिर केले. त्यात राज्यातील १२ टोल नाके बंद केले असून ५३ नाक्यांवर पिवळ्या पट्ट्याच्या

विश्वास मोरे, पिंपरीराज्यशासनाने विधानसभेत शुक्रवारी टोल विषयीचे धोरण जाहिर केले. त्यात राज्यातील १२ टोल नाके बंद केले असून ५३ नाक्यांवर पिवळ्या पट्ट्याच्या गाड्या वगळता कार, रिक्षा, जीपला आता टोल आकारला जाणार नाही. घरगुती वापराच्या गाड्यांना झालेल्या टोलमाफीमुळे राज्यातील काही भागातील वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, चारपैकी तीन नाक्यांबाबत निर्णय प्रलंबित असल्याने टोल सुरूच राहणार आहे. द्रुतगती महामार्गवरील टोलचा निर्णय सरकारने २ महिने राखून ठेवल्याने या निर्णयाकडे लक्ष लागले. द्रुतगतीवर छोट्या वाहनांना टोलमाफी व्हावी, अशी मागणी होत आहे.शहरास जोडणारे, जवळून जाणारे चार मुख्य मार्ग आहेत. पुणे -मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार, कै. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग असे प्रमुख रस्ते असून चारही ठिकाणी टोलनाके उभारले आहेत. टोलमाफी मिळावी यासाठी आजपर्यंत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टोलविषयी आंदोलन केले होते. छोटया वाहनांना, तसेच स्थानिक वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी मागणीही केली होती. मात्र, याबाबत निर्णय झाला नव्हता. आघाडी सरकार जाऊन युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर टोलचा मुद्दा उपस्थित झाला. विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलचे धोरण जाहिर केले आहे. द्रुतगती महामार्ग वगळता अन्य रस्त्यावरील टोलवरून छोट्या वाहनांना टोल आकारला जाणार नाही, असे जाहिर केले आहे.