तिन्ही सभागृहांत ५८ वर्षात गैरहजर नाही; अजितच्या दुर्दैवी घटनेमुळे आता उपस्थित राहता आले नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:06 IST2026-02-05T14:05:52+5:302026-02-05T14:06:41+5:30

सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकणे ही माझी परंपरा असून कधीही गैरहजर न राहिल्याचा दावा पवार यांनी केला आहे

No absenteeism in all three houses in 58 years; Ajit's unfortunate incident has made it impossible for him to be present now - Sharad Pawar | तिन्ही सभागृहांत ५८ वर्षात गैरहजर नाही; अजितच्या दुर्दैवी घटनेमुळे आता उपस्थित राहता आले नाही - शरद पवार

तिन्ही सभागृहांत ५८ वर्षात गैरहजर नाही; अजितच्या दुर्दैवी घटनेमुळे आता उपस्थित राहता आले नाही - शरद पवार

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बुधवारी (दि. ४) सायंकाळी बारामतीतील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. निवासस्थानी प्रवेश करताच शरद पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करत हात जोडले. हा क्षण पाहताच सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणावले, तर उपस्थितांचेही मन गहिवरून आले. संपूर्ण वातावरण भावनिक झाले होते. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांची पहिल्यांदाच भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

आज पहिल्यांदाच शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमनेसामने आले. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब सहयोग निवासस्थानी उपस्थित होते. पार्थ पवार, जय पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, रणजित पवार, विजया पाटील, नीता पाटील, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यासह अनेक कुटुंबीय उपस्थित होते. ज्येष्ठ नेते पवार यांना आतमध्ये आणण्यासाठी पार्थ पवार स्वतः प्रवेशद्वारापर्यंत गेले होते.

थरथरत्या पावलांनी आत आलेल्या शरद पवार यांनी थरथरत्या हातांनीच अजित पवार यांच्या प्रतिमेला हात जोडले. हा प्रसंग पाहून उपस्थितांना गहिवर अनावर झाला. त्यानंतर शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबीयांनी दिवंगत अजित पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्या सहवेदना स्वीकारल्या.

राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाही, या कठीण काळात पवार कुटुंबाचा एकोपा बारामतीकरांनी पुन्हा एकदा अनुभवला. आमदार मिलिंद नार्वेकर यांनीही पवार कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.

दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी असलेल्या आधारतीर्थ आश्रमातील काही निराधार अनाथ चिमुकल्यांनी उपस्थित राहून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. निरागस भावनेने अजितदादांच्या प्रतिमेसमोर हात जोडणाऱ्या या चिमुकल्यांनी दिलेली हृदयस्पर्शी श्रद्धांजली अजित पवार यांचा निराधारांप्रती असलेला जिव्हाळा अधोरेखित करणारी ठरली. 

यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या तिन्ही सभागृहांत गेली ५८ वर्षे कधीही गैरहजर न राहिल्याचा दावा केला आहे. सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकणे ही माझी परंपरा आहे. मात्र अलीकडे घडलेल्या अजितच्या दुर्दैवी घटनेमुळे यावेळी उपस्थित राहता आले नाही,' असे त्यांनी सांगितले आहे. 'अजित पवार यांच्या स्मारकाबाबत मला सध्या अधिक माहिती नाही. सर्वांनी एकत्र बसूनच निर्णय घ्यावा लागेल,' असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title : शरद पवार 58 वर्षों में पहली बार विधानसभा से अनुपस्थित

Web Summary : अजित पवार के निधन के बाद शरद पवार ने सुनेत्रा पवार से मुलाकात की, जो परिवार के लिए एक गहरा भावनात्मक क्षण था। उन्होंने दुर्भाग्यपूर्ण घटना के कारण 58 वर्षों में पहली बार विधानसभा से अनुपस्थित रहने का उल्लेख किया, दुख में परिवार की एकता पर जोर दिया।

Web Title : Sharad Pawar Misses Assembly First Time in 58 Years

Web Summary : Sharad Pawar visited Sunetra Pawar after Ajit Pawar's demise, a deeply emotional moment for the family. He mentioned missing the assembly for the first time in 58 years due to the unfortunate event, emphasizing the family's unity in grief.