शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नऊ दिवसांनंतर चिमुरड्या वडिलांकडे

By admin | Updated: June 21, 2016 00:29 IST

मामाच्या गावाला जाण्यासाठी एकट्याच घराबाहेर पडलेल्या पाच व तीन वर्षांच्या मुली भरकटत गेल्या. त्यानंतर त्यांची तब्बल नऊ दिवसांनी वडिलांबरोबर भेट झाली.

मंचर : मामाच्या गावाला जाण्यासाठी एकट्याच घराबाहेर पडलेल्या पाच व तीन वर्षांच्या मुली भरकटत गेल्या. त्यानंतर त्यांची तब्बल नऊ दिवसांनी वडिलांबरोबर भेट झाली. मंचर पोलीस ठाण्यात या दोन मुलींना त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. भराडी गावातील सत्यवान धोंडीभात्न पारधी यांचे एकटेच घर आहे. जंगलात असलेल्या घरात पारधी मुलींसह राहतात. रविवारी (दि.१२ ) रोजी पारधी बाजार करण्यासठी मंचर येथे आले. त्या वेळी घरी शारदा (वय ५) व रविना (वय ३) या दोन मुली होत्या. आई-वडील बाजाराला गेल्यानंतर दोन्ही मुलींनी मामाच्या गावाला जायचंय म्हणून त्या घराबाहेर पडल्या. चुकून त्या भरकटल्या गेल्या. निरगुडसरमार्गे दोन्ही मुली सायंकाळी गावडेवाडी पिंपळमळा येथे आल्या. सोमवारी सकाळी जि. प. सदस्य दादाभाऊ पारधी व कांताराम केदारी यांनी या मुलींना ताब्यात घेऊन दादाभाऊ गोविंद केदारी या शिक्षकाकडे सांभाळण्यास दिल्या. दोन्ही मुलींना नाव व पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळे त्याच्या पालकांचा शोध लागत नव्हता.या दरम्यान शिक्षक केदारी यांनी मुलींना सांभाळूून त्याच्या पालकांचा शोध सुरू ठेवला. पोलिसांना मुली सापडल्याची माहिती दिली. भराडी येथील मुलीच्या वडिलांना या मुली मंचर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आज सकाळी वडील सत्यवान धोंडीभात्न पारधी, किसन आबासाहेब गावडे यांनी शिक्षक दादासाहेब केदारी यांची भेट घेतली. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे, राजू कांबळे, सागर गायकवाड यांनी शारदा व रविना या दोन्ही मुलींना मंचर पोलीस ठाण्यात आणले व नंतर त्यांना वडिलांच्या स्वाधीन केले. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना हा प्रकार समजला. तेव्हा त्यांनी दोन्ही मुलींचे पालकत्व घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, मुलीच्या वडिलांनी मुलींना घरी नेले. या मुलींना श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कपडे देण्यात आले. (वार्ताहर)