नवा ट्विस्ट..! ग्रामस्थ म्हणतात पोलिसांनी नव्हे आम्ही नराधम दत्तात्रय गाडेला पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 10:27 IST2025-02-28T10:19:46+5:302025-02-28T10:27:21+5:30
Dattatray Gade Arrested: आरोपीला आम्ही पकडल्याचा ग्रामस्थांनी दावा केला आहे.

नवा ट्विस्ट..! ग्रामस्थ म्हणतात पोलिसांनी नव्हे आम्ही नराधम दत्तात्रय गाडेला पकडलं
- किरण शिंदे
पुणे - स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. तीन दिवसांपासून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध पोलीस घेत होते. मात्र तो पोलिसांना चकवा देत होता. दत्तात्रय गाडे गुनाट गावातच लपला असल्याची खात्री पटल्यानंतर आणि पोलिसांनी या गावात मोठा पोलिस फौजफाटा बोलावला. जणू संपूर्ण गावाला पोलिसांनी वेढा घातला. कारण अंधार पडण्याच्या आता पोलिसांना त्याला पकडायचं होतं.
मात्र आता आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यावरुन मोठा ट्वीस्ट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला आम्ही पकडल्याचा ग्रामस्थांनी दावा केला आहे. ग्रामस्थ गणेश गव्हाणे, साईनाथ वळु यांच्यासह इतर काही ग्रामस्थांनी आरोपीला पकडल्याचा दावा केला आहे. काही पोलिसांनी माझ्याकडून आरोपीला हिसकावून नेल्याचा गव्हाणे यांनी खळबळजनक दावा केला आहे.
आरोपीला पकडल्यानंतर त्याची माहीती क्राईम ब्रांचच्या काही पोलीस आणि अधिकाऱ्यांना दिली होती, असेही गव्हाणे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे. ग्रामस्थ गव्हाणे पुढे म्हणाले, गुनाट गावातील जीपीएस क्रिकेट ग्राउंड येथील चंदन वस्तीच्या परीसरात आरोपी होता. तेथे त्याला पकडले होते. असा दावा त्यांनी केला आहे.
तत्पूर्वी पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी मदतीचे नागरिकांना आवाहन केले होते. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. अशात आता ग्रामस्थांकडून आम्हीच आरोपी गाडेला पकडले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे गुनाट गावातच लपला असल्याची खात्री पटल्यानंतर या गावात मोठा पोलिस फौजफाटा बोलावला. जणू संपूर्ण गावाला पोलिसांनी वेढा घातला. कारण अंधार पडण्याच्या आता पोलिसांना त्याला पकडायचं होतं.
मात्र सायंकाळ झाली तरी आरोपीचा शोध लागत नव्हता. अंधार झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन थांबवण्याचे ठरवले. यानंतर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय गाडे गावालगत असणाऱ्या शेतात पोलिसांना काही संशयास्पद हालचाल जाणवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, असता तो दत्तात्रय गाडे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेचा थरार..
- ज्या शेतात दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही
- दत्तात्रय गाडे रात्री नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी साडे दहा वाजता आला
- त्यानंतर तो आल्याची माहीती नातेवाईकांनी पोलिसांना दिली
- दत्तात्रय गाडेने नातेवाईकांकडुन पाण्याची बाटली घेतली. आणि माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथुन निघुन गेला
- त्यानंतर पोलीसांनी या घराच्या परीसरात दत्तात्रय गाडेचा शोध सुरु केला. डॅाग स्कॅाड ही त्याठिकाणी आणले
- पोलीसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला , त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला
- त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलीसांना दाखवला , पण गाडे ज्या ठीकाणावरुन आला होता, तिथे परतलाच नाही. तर तो नातेवाईकांच्या घराच्या परीसरात असलेल्या चारीमध्ये झोपून राहीला याच ठीकाणी तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्तात्रय गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी दत्तात्रय गाडेला तत्काळ ताब्यात घेतलं
- दत्तात्रय गाडे ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी लगेचच पुण्याकडे कुच केली.
- पहाटे २:५० वाजता त्याला घेऊन तपास पथकातील कर्मचारी लष्कर पोलिस ठाण्यात पोहोचले.
- काही वेळात वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले.