शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या उमलत्या भविष्यापुढे निव्वळ अंधकार

By admin | Updated: October 7, 2016 03:49 IST

काट्याकुट्यात किंवा रानावनात राहायचं... रानातील काटेरी झाडं तोडून त्यापासून कोळसा बनवायचा... त्यातून मिळणाऱ्या तोकड्या उत्पन्नावर गुजराण करायची...

सुरेश निडबने /वालचंदनगरकाट्याकुट्यात किंवा रानावनात राहायचं... रानातील काटेरी झाडं तोडून त्यापासून कोळसा बनवायचा... त्यातून मिळणाऱ्या तोकड्या उत्पन्नावर गुजराण करायची... जगण्याची कोणतीच नवी दिशा नाही. त्यामुळे कोळशासारखाच काळाकुट्ट अंधार कायमच समोर दाटलेला. तर आपल्या आई-बापाचा हात धरून रानोमाळ फिरणाऱ्या उमलत्या भविष्यांचासुद्धा आता कोळसाच झाला आहे. वालचंदनगर, कळंब परिसरातील नीरा नदीच्या कडेने शेकडो आदिवासी कुटुंबे आणि त्यांची मुले आज आपले भविष्य शोधत आहेत. वालचंदनगर परिसरातील कोळसा तयार करण्यासाठी आलेली ही कुटुंबे जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून या आदिवासींचे सर्वेक्षण झालेलेच नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याही गावात सामावून घेतले गेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांचा विचार करण्यास शासनस्तरावरही कोणाकडे वेळ नाही. मुळात हे आदिवासी या भागात राहायला आहेत की नाही, याची कल्पनाही शासनदरबारी नाही. मग मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तर खूप लांबचा आहे, अशी व्यथा येथील बबन रामभाऊ पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. देशातील गोरगरीब अन्नविना उपाशी राहू नये. त्याला पोटभर अन्न मिळावे, यासाठी केंद्र शासनाने मागील काही वर्षांपूर्वी अन्नसुरक्षा कायदा आणला. मात्र, या आदिवासींकडे रेशनकार्डच नसल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानातील सवलतीमध्ये धान्य मिळत नाही. ४या आदिवासी कुटुंबाच्या पिढ्यान्पिढ्या अठराविश्वे दारिद्र्यात गेल्या आहेत. बबनने सांगितले, की आम्हाला ना घरदार, ना हाताला काम. त्यामुळे सरपण तोडून वाटा काढत कोळसा बनवून कुटुंब सांभाळावे लागते. ४आम्हा आदिवासींना सरकारच्या कोणत्याही सुविधा नाही. त्यामुळेच आदिवासीच म्हणून भटकंती करीत आहोत. मुलांना शाळेत पाठवण्याची इच्छा आहे; परंतु भाकरी मिळवण्यासाठी भटकंती करावी लागते. ४एकीकडे शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी स्पर्धा लागते. त्यासाठी शिक्षकांची पळता भुई थोडी होते. मात्र येथील आदिवासी पाड्यावर शेकडो मुले रानावनात भटकंती करत आहेत. सर्वशिक्षा अभियान येथे अजूनही पोहोचले नाही.