शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

 ‘डिजिटल रिपॉझिटरी’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 15:54 IST

इलेक्ट्रॉनिक पुरावा : न्यायाधीशांच्या समितीची सी-डॅकला भेट

ठळक मुद्देमागील काही वर्षांत मोबाईल, संगणक यांसह विविध इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले. सध्या इंडियन इव्हिडन्स अ‍ॅक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरण्याबाबत स्पष्ट नियमावली नाही. इलेक्ट्रॉनिक पुरावे सुरक्षितपणे जतन करण्यासाठी ‘सी-डॅक’ने ‘ट्रस्टेड डिजिटल रिपॉझिटरी’ निर्माण करण्याबाबत सूचित

पुणे : इंडियन इव्हिडन्स अ‍ॅक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या नियमांचा अंतर्भाव करण्यासाठी नेमण्यात आलेल्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या समितीने नुकतीच प्रगत संगणन विकास केंद्राला (सी-डॅक) भेट दिली. या वेळी इलेक्ट्रॉनिक पुरावे सुरक्षितपणे जतन करण्यासाठी ‘सी-डॅक’ने ‘ट्रस्टेड डिजिटल रिपॉझिटरी’ निर्माण करण्याबाबत सूचित केले आहे. मागील काही वर्षांत मोबाईल, संगणक यांसह विविध इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, सध्या इंडियन इव्हिडन्स अ‍ॅक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरण्याबाबत स्पष्ट नियमावली नाही. हे नियम तयार करण्यासाठी देशातील विविध उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची समिती स्थापन केली आहे. या समितीने नुकतीच सी-डॅकला भेट देऊन माहिती घेतली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हेमंत गुप्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. ओक, ए. के. मेनन, पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजेश बिंदाल, राजीव नरेन रैना, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. एस. मुरलीधरन, राजीव सहाय एंडला आणि पुणे न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. मोडक यांचा यामध्ये समावेश होता.सी-डॅकचे वरिष्ठ संचालक डॉ. दिनेश कात्रे व सहकाऱ्यांनी संवाद साधून माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची सुरक्षितता, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून माहिती मिळविणे, ती जतन करणे, विश्वासार्हत जपणे, माहितीची तपासणी करणे, सुरक्षित ठेवणे याबाबत माहिती देण्यात आली.मागील काही वर्षांत मोबाईल, संगणक यांसह विविध इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, सध्या इंडियन इव्हिडन्स अ‍ॅक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरण्याबाबत स्पष्ट नियमावली नाही. हे नियम तयार करण्यासाठी देशातील विविध उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची समिती स्थापन केली आहे. या समितीने नुकतीच सी-डॅकला भेट देऊन माहिती घेतली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हेमंत गुप्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. ओक, ए. के. मेनन, पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजेश बिंदाल, राजीव नरेन रैना, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. एस. मुरलीधरन, राजीव सहाय एंडला आणि पुणे न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. मोडक यांचा यामध्ये समावेश होता.सी-डॅकचे वरिष्ठ संचालक डॉ. दिनेश कात्रे व सहकाऱ्यांनी संवाद साधून माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची सुरक्षितता, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून माहिती मिळविणे, ती जतन करणे, विश्वासार्हत जपणे, माहितीची तपासणी करणे, सुरक्षित ठेवणे याबाबत माहिती देण्यात आली. रिपॉझिटरी’ निर्माण करण्याबाबत समितीला सुचविण्यात आले असल्याचे डॉ. कात्रे यांनी सांगितले. डिजिटल पुरावे मिळविण्याबाबत सी-डॅककडून आधीपासून न्यायालयीन कामकाजाशी संबंधित लोकांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती कार्यकारी संचालक (कॉर्पोरेट) कर्नल (निवृत्त) अशीत के. नाथ यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसCrimeगुन्हा