शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

“सुनेत्रा काकींमध्ये अजित काकांना बघतो”; दोन्ही NCP विलीनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 10:24 IST

NCP SP Group MLA Rohit Pawar News: अजितदादा गेले, या दुःखातून अजूनही पवार कुटुंब सावरलेले नाही. अजितदादांचे स्वप्न पूर्ण होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.

NCP SP Group MLA Rohit Pawar News:अजित पवार यांची मनापासून इच्छा होती की, कुटुंब म्हणून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. अजितदादा त्यासाठी प्रयत्न करत होते. सुप्रिया सुळे आणि शरद पवार हेही त्यादृष्टीने प्रयत्न करत होते. अजित पवारांचे निधन झाल्यानंतर आता १३ दिवस पवार कुटुंब एकत्रित आहे. आता याही पुढे अजित पवार यांचे जे स्वप्न आहे की, कुटुंब म्हणून एकत्र राहिले पाहिजे, असेच काहीसे होईल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यात एक बैठक झाली होती. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन भावनिक होते. येत्या काळात काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. परंतु, त्या राजकीय नसतील. अजितदादांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करायच्या आहेत. त्या कशा करता येतील, याबाबत चर्चा झाली, अशी माहिती रोहित पवारांनी दिली. 

सुनेत्रा काकींमध्ये अजित काकांना बघतो

सुनेत्रा काकींमध्ये मी अजित काकांना बघतो. राष्ट्रीय अध्यक्षपदाची रिक्त झालेली जागा सुनेत्रा काकींनाच मिळावी, ही कुठेतरी इच्छा आहे. सुनेत्रा काकी, पार्थ, जय, आम्ही या दुःखातून सावरलो नाही. राजकीय विचार मनामध्ये येत नाहीत. ही घटना दुर्दैवी आहे. मला राजकीय विचार करण्याची क्षमता येईल, तेव्हा आम्ही स्पष्ट सांगू. पवार कुटुंबियात कुठली राजकीय चर्चा झालेली नाही. ९ तारखेनंतर त्यावर पवार कुटुंबात चर्चा होईल. विलीनीकरण का होणार होते, कशासाठी होणार होते, दादांच्या मनात काय इच्छा होती, त्याला राजकीय अंग आहे की भावनिक अंग आहे, हे मी १२ तारखेला सांगणार आहे, असे रोहित पवार म्हणाले. 

दरम्यान, या मतदान केंद्रावर आल्यानंतर सर्व राजकीय आठवणी माझ्या डोळ्यासमोर आल्या. अजितदादांसोब अनेकदा चर्चा होत असे. त्या सर्व गोष्टी आठवू लागल्या. दादांचे जे स्वप्न होते की, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे .जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्या विचाराचे निवडून आले पाहिजेत, ही दादांची इच्छा होती. मतदार त्यांची इच्छा पूर्ण करतील, जास्त उमेदवार दादांची निवडून येतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar sees Ajit Pawar in Sunetra; merger statement made.

Web Summary : Rohit Pawar expressed hope that Ajit Pawar's dream of family unity would be realized, especially after his recent passing. Discussions are ongoing, and Sunetra Pawar is viewed as a potential successor for a national position. Political discussions are paused until after the 9th, with a statement planned for the 12th.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५zpजिल्हा परिषदBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारparth pawarपार्थ पवार