राष्ट्रवादीचे पदाधिकारी बीडीपीवरुन आक्रमक

By Admin | Updated: August 23, 2015 04:37 IST2015-08-23T04:37:42+5:302015-08-23T04:37:42+5:30

महापालिका हद्दीतील जैव विविधता उद्यान (बीडीपी) आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पाच नगरसेवकांच्या

NCP office bearers aggressive from BDP | राष्ट्रवादीचे पदाधिकारी बीडीपीवरुन आक्रमक

राष्ट्रवादीचे पदाधिकारी बीडीपीवरुन आक्रमक

पुणे : महापालिका हद्दीतील जैव विविधता उद्यान (बीडीपी) आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पाच नगरसेवकांच्या राजीनाम्यानंतर खडकवासला मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे शनिवारी दिले.
राज्य शासनाने महापालिकेतील समाविष्ट २३ गावांतील डोंगर-टेकड्यांच्या उतारावरील सुमारे ९७६ हेक्टर क्षेत्रावर बीडीपी आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.
या आरक्षणाला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अनेक नगरसेवकांचा विरोध असताना शहराध्यक्षा अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्यामुळे बीडीपीविषयी राष्ट्रवादीची द्विधा मनस्थिती झाली असून, स्पष्ट भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे नगरसेवक दिलीप बराटे, विकास दांगट, संगीता कुदळे, लक्ष्मी दुधाणे आणि सचिन दोडके यांनी पक्षाचे राजीनामे दिले होते.

Web Title: NCP office bearers aggressive from BDP