शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
2
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
5
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
6
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
7
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
8
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
9
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
10
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
11
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
12
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
13
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर
14
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
15
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
16
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
17
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
18
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
19
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
20
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले

चुकीच्या शिक्षक बदलीच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादीने भरविली रस्त्यावर शाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 18:27 IST

सध्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकट्या मुळशीतील ३९ शाळा बंद करण्याची वेळ आली आहे....

ठळक मुद्देराज्य शासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनया आंदोलनात कायमस्वरूपी शिक्षक न मिळालेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग

पौड : राज्य शासनाचे शिक्षक बदली धोरण व त्याची चुकीची अंमलबजावणी झाल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी मुळशी तालुक्यातील ३९ शाळांना तात्पुरत्या स्वरूपाचे शिक्षक मिळाल्याने शासनाच्या शिक्षण विभागाच्या निषेधार्थ मुळशी तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पौड पंचायत समितीच्या आवारात रस्त्यावरच शाळा भरविण्याचे आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनाला मुळशी जि.प.च्या माजी सभापती सविता दगडे, माजी गटनेते शांताराम इंगवले, सुभाष अमराळे, विद्यमान जि.प. सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, मुळशी पंचायत समितीच्या सभापती कोमल साखरे, सदस्या राधिका कोंढरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनात कायमस्वरूपी शिक्षक न मिळालेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना घेऊन त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या वेळी पौड पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कोंढरे म्हणाले, की शिक्षक बदलीचे सुगम व दुर्गम पद्धतीचे बदली धोरण योग्य आहे; परंतु प्रशासनाच्या वतीने त्याची होणारी अंमलबजावणी मात्र चुकीची आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. मुळशी तालुका राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले, यापूर्वीच्या राजकीय इतिहासात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने अशा चुकीच्या पद्धतीच्या धोरणाचा अवलंब केलेला नव्हता. परंतु, सध्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकट्या मुळशीतील ३९ शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही हे रस्त्यावर शाळा भरविण्याचे आंदोलन केले आहे. राज्य शासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.  

टॅग्स :PaudपौडSchoolशाळाStudentविद्यार्थीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी