नसरापूरमध्ये ११ जागांपैकी ५ जागा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:07+5:302021-01-08T04:30:07+5:30

नसरापूर ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमी बहुचर्चित असल्यामुळे येथील निवडणुकीला राजकीय आखाड्याऐवजी या निवडणुकीतील पक्षविरहित राजकारणाला विशेष महत्त्व आहे. नसरापूर ग्रामपंचायत ...

In Nasrapur, 5 out of 11 seats are unopposed | नसरापूरमध्ये ११ जागांपैकी ५ जागा बिनविरोध

नसरापूरमध्ये ११ जागांपैकी ५ जागा बिनविरोध

नसरापूर ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमी बहुचर्चित असल्यामुळे येथील निवडणुकीला राजकीय आखाड्याऐवजी या निवडणुकीतील पक्षविरहित राजकारणाला विशेष महत्त्व आहे.

नसरापूर ग्रामपंचायत ही अकरा सदस्यीय आहे. या वेळी निवडणुकीपूर्वीच पाच जागा बिनविरोध आल्याने उर्वरित सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. या सहा जागांसाठी चौदा उमेदवार रिंगणात आहेत. तसेच, या चौदा उमेदवारांपैकी नऊ महिला उमेदवार आहेत. या वेळी क्रमांक दोन व तीन वार्ड मधील पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी वार्ड क्रमांक दोन मधून शेटे रोहिणी अनिल, हाडके श्रद्धा संतोष, वाल्हेकर सुधीर सोपान व वार्ड क्रमांक तीन मधून कदम संदीप शंकर व चव्हाण नामदेव आत्माराम हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

उर्वरित वार्ड क्रमांक एक व चार मध्ये सहा जागांसाठी चौदा उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. वार्ड क्रमांक मधून कांबळे अश्विनी संदीप, वाघमारे अर्चना प्रफुल्ल, घाटे सुमन संजय, झोरे सपना ज्ञानेश्वर, गायकवाड जमुना सिद्धार्थ, मुलानी इरफान हबीब, राशिनकर सागर सतीश. वार्ड क्रमांक ४ : झोरे वैशाली अरुण, लष्कर मेघा उमेश, कदम उषा विक्रम, तनपुरे प्रतिभा पांडुरंग, दळवी गणेश सुरेश, बागमार गौरव देविचंद, परदेशी सचिन एकनाथ असे चौदा उमेदवार रिंगणात आहेत. यापूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील पाच उमेदवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Web Title: In Nasrapur, 5 out of 11 seats are unopposed