शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

नाव केवळ गणराजाचे; सक्ती मात्र बळीराजावर !

By admin | Updated: September 21, 2015 04:08 IST

दुष्काळसदृश परिस्थिती, वाया गेलेला हंगाम आणि पावसाने दिलेली ओढ यामुळे अगोदरच नाडला गेलेल्या बळीराजावर आता गणराजाच्या

पुणे : दुष्काळसदृश परिस्थिती, वाया गेलेला हंगाम आणि पावसाने दिलेली ओढ यामुळे अगोदरच नाडला गेलेल्या बळीराजावर आता गणराजाच्या नावाने वर्गणीची सक्ती केली जात आहे. पुण्यामध्ये मार्केट यार्डात भाजी विक्रीसाठी येणाऱ्या अनेक शेतकरी व मालवाहतूकदारांना या बळजबरीने वसूल केल्या जाणाऱ्या वर्गणीचा अनुभव आज आला. मार्केट यार्डात रविवारी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन मार्केट यार्ड परिसरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून सक्तीने वर्गणी गोळा केली. कोणतीही पावती न देता मार्केट यार्डमधील गणपती मंडळाचे कार्यकर्ते वाहनचालकांकडून सक्तीने पैसे वसूल करीत होते. संबंधित विभाग प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यांनी याविषयी कोणतेही पाऊल न उचलता मौन राखले. त्यामुळे त्यात आणखी भर पडली आणि परिसरातील इतर मंडळांनीही शेतकऱ्यांकडून सक्तीचे वर्गणी वसुली केली.मार्केट यार्डातील गणपती आडत्यांचा आणि परिसरातील व्यापाऱ्यांचा असल्याने त्याच संबंधितांकडून गणपतीची वर्गणी गोळा करणे अपेक्षित आहे, असे काही व्यापारी खासगीत सांगत आहेत. परंतु, रविवारी मार्केटयार्डात येणाऱ्या वाहनचालकांकडून मार्केटयार्डातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सक्तीने वर्गणी वसूल केली. त्यामध्ये ट्रक चालकांकडून २०० रुपयांची तर टेम्पो चालकांकडून १०० रुपये वर्गणी स्वरुपात घेतले जात होते. मार्केटयार्डच्या गेट नं. १ मधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांकडून ही वर्गणी गोळा करण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हातात शारदा गणेशाचे स्टिकर होते. स्टीकर देऊन वाहन चालकांना वर्गणी देण्याचा आग्रह केला जात होता. वर्गणी न देणाऱ्या वाहनास गेटच्या बाहेर जाऊ दिले जात नव्हते. तसेच त्याला अरेरावीची भाषा वापरली जात होती. मार्केटयार्ड परिसरात दर रविवारी सुमारे २०० ट्रक आणि ६०० छोटे-मोठे टेम्पो माल वाहतूक करतात. (प्रतिनिधी)