शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नाव चितळेचे, बाकरवडी मात्र दुसरीच; चितळे स्वीट होम वर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 22:25 IST

पुणे पोलिसांनी नोंदवला "चितळे स्वीट होम" वर गुन्हा, चितळे बंधु मिठाईवाले यांचे इंद्रनील चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी यांनी पोलिसात तक्रार दिली. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल, यावरून प्रमोद प्रभाकर चितळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

किरण शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: "चितळे स्वीट होम" यांनी चितळे बंधु मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून  चितळे बंधु मिळाईवाले यांचे असल्याचे भासवुन, नावाचा गैरवापर करुन फसवणुक केली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गेल्या ४ वर्षांपासून चितळे बंधू मिठाईवाले कार्यालयात इंद्रनील चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहतात. चितळे बंधु मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजे रांजे येथे बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लॉन्ट आहे. याशिवाय पर्वती इंडस्ट्रीयल, टिमवि कॉलनी मुकुंदनगर याठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिटस् आहेत

गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाखरवडी ची बदल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची दखल घेत फिर्यादी यांनी बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून "चितळे स्वीट होम" नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीचे पाकिटे खरेदी केली. चितळे स्वीट होम नावाने असणारे बाकरवडीची पाकिटे व आमच्या नियमीत तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसुन आली.

खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकरवडीमध्ये तफावत असल्याचे फिर्यादी यांना आढळून आले. तसेच त्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी customercare@chitalebandhu.in कस्टमर केअर नंबर 9922944482, व वेबसाईट www.chitalebandhu.in डिटेल्स हे पाकिटांच्या साईड पट्टीवर हुबेहुब छापले असल्याचे दिसुन आले.

अशाप्रकारे "चितळे स्वीट होम" चे प्रोपा प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे बंधु मिळाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती स्वतःचे प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवुन चितळे बंधु मिठाईवाले यांचे नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करुन चितळे बंधु मिठाईवाले यांची प्रमाणात फसवणुक केल्याचे समोर आलं आहे

भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३५०, ६६(सी), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी