नोटाबंदीचा फटका आजीबार्इंना

By Admin | Updated: May 9, 2017 03:53 IST2017-05-09T03:51:06+5:302017-05-09T03:53:12+5:30

केंद्र सरकारने गतवर्षी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता देशात नोटाबंदी जाहीर झाली. त्यानंतर चलनातून जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा पूर्णत:

Nabacidi shakibatei | नोटाबंदीचा फटका आजीबार्इंना

नोटाबंदीचा फटका आजीबार्इंना

लोकमत न्यूज नेटवर्क
किवळे : केंद्र सरकारने गतवर्षी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता देशात नोटाबंदी जाहीर झाली. त्यानंतर चलनातून जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा पूर्णत: बाद करण्यात आल्या. या घटनेला सोमवारी सहा महिने पूर्ण झाले. नोटबंदीच्या काळात देहूरोड, किवळे व रावेत भागातील काही वृद्ध आजीबाईंनी त्यांच्या बटव्यात व साडीच्या पिरवटात साठविलेल्या काही जुन्या नोटा मुलांना, नातवांना बदलून आणण्यासाठी दिल्या खऱ्या; मात्र सहा महिने उलटूनही या नोटा परत आजीबाईंना मिळाल्या नसल्याचा प्रकार समोर येत असल्याने अशा ‘हुशार’ मुलांच्या व नातवांच्या कर्तृत्वाची परिसरात चर्चा होऊ लागली आहे. अनेक अशिक्षित ज्येष्ठांना अशा पद्धतीने गंडविल्याच्या घटना झाल्याचेही बोलले जाते.
नोटाबंदीच्या काळात सुरुवातीला ५० दिवस जुन्या नोटा बदलून देण्यात येत होत्या. बँक खात्यात जमा करण्याची मुभा देण्यात आली होती. देहूरोड, किवळे व रावेत भागातील विविध घरांतील आजीबाईंनी त्यांना नातेवाइकांकडून, तसेच निवृत्तिवेतनातून शिल्लक राहिलेल्या पैशांत हजार व पाचशेच्या जुन्या नोटा होत्या. त्या नोटा बटव्यात, तसेच साडीच्या पिरवटात साठवून ठेवल्या होत्या. काही आजीबाईंचे वय झाल्यामुळे व लिहिता-वाचता येत नसल्याने जुन्या नोटा बंदची चर्चा ऐकून त्यांनी साठविलेले सर्व पैसे कारभारी मुलाकडे किंवा कारभाऱ्याच्या मुलाकडे म्हणजे नातवाकडे बदलून आणण्यासाठी दिले.
हे पैसे स्वत:च्या खात्यावर भरून बदलून घेतले असताना आजीबाईंनी सध्या लग्नसराई असल्याने नात्यातील लग्नात काही खर्च करण्यासाठी, ये-जा करण्यासाठी मागितले असता, संबंधित मुले व नातू असे पैसे देण्यास टाळाटाळ करत तुला पैसे कशाला हवेत, असे उलट प्रश्न विचारत असल्याची माहिती मिळाली
आहे.

Web Title: Nabacidi shakibatei