शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जाळपोळ प्रकरणामागील गूढ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2015 03:47 IST

सिंहगड रस्त्यावर गाड्यांच्या जाळपोळीचा छडा २४ तासांत लावू, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिल्यानंतर २४ तास उलटले

पुणे : सिंहगड रस्त्यावर गाड्यांच्या जाळपोळीचा छडा २४ तासांत लावू, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिल्यानंतर २४ तास उलटले असून, या प्रकरणातील गूढ वाढतच चालले आहे. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना ‘हे कृत्य माथेफिरूचे वाटत नाही; तो पूर्वनियोजित कट असावा,’ असे वक्तव्य केले असून, आरोपीचा मागमूस नसल्याचे स्पष्ट केले आहे. जाळपोळीचे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. जाळपोळ प्रकरण झाल्यानंतरच्या सायंकाळी याच भागात झालेल्या खून प्रकरणातील माथेफिरू आरोपीचे साम्य सीसी टीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या संशयिताशी असावे, या दाट निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत, असे सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी सोमवारी सांगितले होते. पाठक यांच्या खुलाशामुळे कालचा निष्कर्ष चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. ठेकेदारीच्या कामातील पैशांच्या वादावरून हा खून झाला होता. विनोद जमदाडे याचे आणि सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयितांमध्ये बरेच साम्य आहे. त्या संशयिताने जीन्स पंट आणि टी शर्ट परिधान केलेला आहे, जमदाडे याच्या अंगावर तसेच कपडे असून तो सतत दारूच्या नशेत असतो.त्याच्याकडे चौकशी सुरू असून त्यानेच हा प्रकार केला असावा, अशा निष्कर्षापर्यंत आम्ही ९९ टक्के आलो आहोत, असे रामानंद यांनी नमूद केले होते. पाठक यांच्या ताज्या वक्तव्यामुळे हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट होत असून, कांबळे यांचे २४ तासांत आरोपीला पकडू, हे आश्वासनही विरले आहे. सामान्य नागरिकांत मात्र या प्रकारामुळे संताप वाढीस लागला आहे. (प्रतिनिधी)सिंहगड रस्त्यावरच्या डॉमिनोज पिझ्झा या हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या मोटरसायकलींना व परिसरातील सनसिटी रस्त्यावरच्या निर्मल टाऊनशिपमधील सूर्यनगरी, स्वामी नारायण, अवधूत, अक्षय ग्लोरी या सोसायट्यांमधील दुचाकी व चारचाकी वाहनांना एकापाठोपाठ आग लावून समाजकंटक पसार झाला. रविवारी पहाटे तीन ते साडेचारदरम्यान एक ते दीड किलोमीटरच्या पट्ट्यात झालेल्या या भीषण दुर्घटनेत, आगीच्या ५ घटनांत ८४ दुचाकी व ६ चारचाकी वाहने खाक झाली.