सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात खून, वडिलांकडून अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:38 IST2024-01-03T13:38:33+5:302024-01-03T13:38:47+5:30

मुलीवर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाला

Murders in Pune for the third day in a row minor girl killed with ax by her father | सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात खून, वडिलांकडून अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने हत्या

सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात खून, वडिलांकडून अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने हत्या

किरण शिंदे

पुणे : पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाची घटना घडली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोली परिसरात वडिलांनीच मुलीचा अतिशय निर्घृणपणे खून केलाय. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.  अक्षदा फकीरा दुपारगुडे (वय १५, सध्या राहणार वाघोली, मूळ सोलापूर) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे‌.

स्वतः बापानेच कुऱ्हाडीने वार करत अक्षदाला संपवलं. कुऱ्हाडीने डोक्यात, हातावर, पायावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षदाला रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली. अक्षदावर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीच्या मावशीच्या पतीच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: Murders in Pune for the third day in a row minor girl killed with ax by her father