शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वाचता येईना; ‘सक्षम’ करण्यासाठी लाखोंची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:42 IST

अनेक विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नसल्याचे समोर आले आहे.

पिंपरी : महापालिका शाळांमधील असक्षम विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी सुमारे ६० हजार पुस्तकांची खरेदी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागामधील खरेदीच्या गोंधळामुळे डीबीटीचा निर्णय घेतला असताना ही खरेदी करताना भांडार विभागामार्फत ठेकेदारांना पायघड्या घालण्यात आल्या आहेत. शहरातील महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सक्षम मराठी आणि गणित या विषयाची तीन भागांतील ६० हजार पुस्तके खरेदी करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागाच्या मागणीनुसार मध्यवर्ती भांडार विभागाकडून याबाबतची निविदा काढण्यात आली आहे. अंदाजे ८५ लाख रुपयांची ही निविदा आहे. ही निविदाप्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर महापालिकेला साहित्य उपलब्ध होणार आहे. नंतर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. निविदा प्रक्रियेसाठी अंदाजे तीन महिन्यांचा कालावधी लागणार असून ही खरेदी पुढील शैक्षणिक वर्षासाठी करण्यात येणार आहे.

दरम्यान, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये लिहिता वाचता न येणाऱ्या मुलांची चार विभागांत विभागणी करण्यात आली. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा सक्षम उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.ठेकेदारांचे भले?

दुसरीकडे महापालिकेने साहित्य खरेदी न करता डीबीटी पद्धत अवलंबली होती. मात्र, थेट डीबीटी न करता ठेकेदारांमार्फत साहित्य पुरवठा करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने राबविली. त्यावेळी डीबीटीला फाटा देण्यात आला. यावेळी पुन्हा सक्षम उपक्रमासाठी पुस्तके खरेदी करताना ८५ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली. यातून पुन्हा डीबीटी प्रक्रिया धाब्यावर बसवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणाचा उद्देश आहे की, ठेकेदारांचे भले करण्याचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तिसरी ते आठवीपर्यंत तीस हजार विद्यार्थी आहे. त्यामध्ये ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही, त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे. यामध्ये भाषा व गणित यांची प्रत्येकी तीन पुस्तके असणार आहेत. तसेच ही पुस्तके वैयक्तिक कोणाला न देता शाळेसाठी ठेवली जाणार आहेत. त्यामुळे त्यांचा वापर कायमस्वरूपी करता येईल. ही पुस्तके शाळेतील शिक्षकांनीच तयार केली आहेत. त्यामुळे त्याचा फायदा मुलांना होऊन गुणवत्ता वाढेल. - प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाStudentविद्यार्थीEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकSchoolशाळा