शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या शिष्यवृत्तीचा खेळखंडोबा

By admin | Updated: March 21, 2015 00:14 IST

महापालिकेकडून दहावी, बारावीमधील गुणवंतांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा खेळखंडोबा सुरू असल्याची बाब शुक्रवारी पुन्हा मुख्य सभेत समोर आली.

पुणे : महापालिकेकडून दहावी, बारावीमधील गुणवंतांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा खेळखंडोबा सुरू असल्याची बाब शुक्रवारी पुन्हा मुख्य सभेत समोर आली. या शिष्यवृत्तीसाठी एक लाखाच्या उत्पन्नाची अट लावण्यास तसेच ती थेट बँकेत जमा करण्यास मागील महिन्यात मुख्य सभेत सर्वपक्षीय विरोध झाला होता. त्यामुळे जवळपास १ हजाराहून अधिक मुलांची शिष्यवृत्ती बँकेत जमा न करता त्यांचे धनादेश काढण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले असतानाच आता पुन्हा ही शिष्यवृत्ती खात्यात जमा करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय मुख्य सभेत घेण्यात आला आहे.त्यामुळे नगरसेवकांना नेमकी काय भूमिका घ्यायची याबबतचा संभ्रम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.या वेळी प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी या मुलांची शिष्यवृत्ती थेट खात्यात जमा करण्यात येणार होती. मात्र, मुख्य सभने धनादेश काढण्याचे आदेश दिल्याने ती ३१ मार्चपर्यंत देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याने जगताप यांनी सांगितले.त्यानंतर या शिष्यवृत्तीचे श्रेय घेण्यासाठी नगरसेवकांकडून आटापीटा केला जात असताना विद्यार्थ्याला प्रतिचेक ४८ रुपये खर्च करावा लागत असल्याचे सांगत काँग्रेसच्या नगरसेविका कमल व्यवहारे यांनी आॅनलाइन पद्धतीने थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करावे, अशी भूमिका मांडली. त्याला पाठिंबा देत डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी ही भूमिका उचलून धरली; मात्र भाजपा आणि मनसेच्या नगरसेवकांनी याला आक्षेप घेत चेकद्वारेच पैसे द्या, अशी आग्रही मागणी करत याला विरोध केला.मात्र, अनेक नगरसेवकांनी त्यास विरोध केला. त्या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी चर्चा करावी व ही शिष्यवृत्ती थेट बँकेत जमा करण्याचा तसेच त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च येत असल्याने त्यास अट घालण्याची मागणी मनसेचे गटनेते बाबू वागकर यांनी केली. त्यानुसार, याबाबत पक्षनेत्यांनी निर्णय घेण्यास मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)प्रशासनावरच टीका४महापालिकेच्या शाळांमधून दहावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या ७१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत चर्चेसाठी आला होता. या वेळी भाजपाच्या नगरसेवकांनी आधीची शिष्यवृत्ती अद्याप पालिकेस मिळाली नसल्याचे सांगत प्रशासनावर टीका करण्यास सुरुवात केली.