शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबचतीसाठी महापालिकेचा पुढाकार

By admin | Updated: July 16, 2014 04:01 IST

गेल्या दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीचे रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण झाले आहे.

हणमंत पाटील, पुणेगेल्या दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीचे रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे ४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या टेरेसमुळे पावसाळ्यात सुमारे २१ लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे. पाणी बोअरवेलद्वारे थेट भूगर्भात सोडले जात असून, त्यामुळे बोअरवेलचे पुनर्भरण करण्यात येत आहे. राज्य शासनाने १० वर्षांपूर्वी सर्व महापालिकांना नवीन इमारतींचे नकाशे मंजूर करताना, रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही महापालिकेच्या पातळीवर रेनवॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी करण्याविषयी उदासीनता होती. पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीसाठीची रेनवॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा धूळखात पडल्याचा प्रकार ‘लोकमत’ने प्रथम उजेडात आणला होता. त्यानंतर तत्कालीन आयुक्त महेश पाठक यांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार रेनवॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी तातडीने करण्याविषयीचे परिपत्रक काढले होते. त्यानंतर माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या निधीतून २५ लाख व महापालिकेचे २० लाख असा ४० लाख रुपयांचा रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या चारही बाजूला सुमारे ४००० चौरस मीटर क्षेत्र आहे. पुण्यातील पावसाची वार्षिक सरासरी ६२५ मिलिमीटर आहे. त्यानुसार संपूर्ण पावसाळ्यात मिळून २१ लाख लिटर पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेद्वारे संकलित होणार आहे. इमारतीच्या उत्तर व दक्षिण भागातून पाणी संकलित होऊन थेट बोअरवेलमध्ये सोडण्यात येत आहे. ही बोअरवेल २०० फूट खोल आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगचे पाणी बोअरवेलद्वारे भूगर्भात सोडले जात आहे. त्यामुळे पुनर्भरण झालेल्या बोअरला महापालिकेची फायर फायटिंग यंत्रणा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत संबंधित पाण्याचा उपयोग आग विझविण्यासाठी करण्यात येणार आहे, असे उपअभियंता अभिजित डोंबे यांनी सांगितले.